कोकणामधून भारतभर आंबा पाठवला जातो. भारतच नाही तर इतर देशांमध्येही कोकणातील आंब्याला मोठ्याप्रमाणावर मागणी असते. ( See the new trick to identify Devgad Alphonso Mango)रत्नागिरी हापूस असेल किंवा देवगड हापूस असेल या आंब्यांना बाजारात मोठी मागणी असते. देवगड हापूसचे विक्रेते चौका-चौकात दिसतात. पण ते विकत असलेला आंबा देवगडचा अस्सल आहे की नाही हे कसे ओळखायचे?
निम्न दर्जाचा आंबा देवगड हापूसच्या नावाखाली बाजारात विकला जातो. ग्राहक आंबा देवगडवरूनच आला आहे या विचाराने तो विकतही घेतात. तो चवीला चांगला निघत नाही. आंबा प्रचंड महाग फळ आहे. ( See the new trick to identify Devgad Alphonso Mango)त्यामुळे तो ग्राहकांपर्यंत चांगलाच पोहचला पाहिजे. ग्राहकांची होणारी फसवणूक बंद व्हावी यासाठी काही नवीन नियम तयार करण्यात आले आहेत.
डिजिटल प्रभात या चॅनलशी संवाद साधताना देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे संचालक ओंकार सप्रे यांनी सांगितले की, यंदा ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून संस्थेमार्फत काही महत्त्वाची पावले उचली गेली आहेत. जे आंबे खरच देवगडवरून आले आहेत, त्यांच्यावर एक स्टिकर लावला गेला आहे. प्रत्येक आंब्याला एक युनिकोड दिला गेला आहे. हा युनिकोड दोन भागांमध्ये आहे. तसेच त्यावर विक्रेत्यांचा वॉट्सअप क्रमांक दिलेला आहे.
त्या वॉट्सअप नंबरवर तुम्ही हाय असा मेसेज पाठवल्यावर यंत्रणा एक कोड विचारेल. स्टिकरच्या काळ्या तुकड्याखाली हा कोड लिहिलेला आहे. स्टिकर फाडायला गेल्यावर तो अर्धाच फाटतो. काळा भाग फाडून खाली लिहिलेला कोड टाईप करा. म्हणजे तुम्हाला तो आंबा कोणी पाठवला कुठून आला ही सगळी माहिती मिळेल. हा कोड जर त्या आंब्यावर आहे तरच तो देवगड हापूस आहे.