प्रत्येक सणाला आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचा प्रसाद तयार केला जातो. खीर केली जाते. (See the recipe for making neem prasad for Gudi Padwa)पुरणपोळी केली जाते. हलवा केला जातो. बाप्पासाठी मोदकांचा नैवेद्य तयार केला जातो. तसेच विविध प्रकारचे गोड पदार्थ आपण नैवेद्यासाठी तयार करतो. मात्र गुढीपाडवा हा एकच सण असले जेव्हा प्रसादाला गोड नाही तर कडू पदार्थ खाल्ला जातो. (See the recipe for making neem prasad for Gudi Padwa)गुढीपाडव्याच्या दिवशी प्रसादासाठी कडूनिंबाची पाने वापरली जातात. त्या पानांपासून हा प्रसाद तयार करण्याची परंपरा आहे. मात्र असे का केले जाते यामागे काही कारणे आहेत.
गुढीपाडवा म्हणजे वसंत ऋतूची सुरवात. उन्हाळा वाढायला लागलेला असतो. (See the recipe for making neem prasad for Gudi Padwa)त्यामुळे शरीराला चांगले पोषण मिळावे यासाठी पाडव्याला कडूनिंबाचा पाला महत्त्वपूर्ण असतो. गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस या दिवशी औषधी पदार्थ खायला सुरवात करायची आणि वर्षभर पुढे असे पौष्टिक पदार्थ खायचे असाही एक हेतू यामागे असतो. कडूनिंबाचा पाला शक्तीवर्धक असतो. शरीराच्या विविध समस्यांवर तो मात करण्यासाठी मदत करतो. हा पाला विविध संसर्ग शरीरापासून दूर लोटतो. ऊन्हामुळे येणारी खाज नाहीशी करतो. शरीरावर उठणारे पुरळही कमी होते.
मात्र हा पाला फारच कडू असतो त्यामुळे लहान मुलेच नाही तर सगळेच तो खाण्यासाठी नखरे करतात. म्हणून मग प्रसादासाठी चमचाभर खा असे वडीलधारे सांगतात. हा प्रसाद थोडा चविष्ट करता येतो. घरातील सगळेच नाक न मुरडता प्रसाद नक्कीच खातील. त्यासाठी ही रेसिपी पाहा.
साहित्य
कडूनिंबाचा पाला, गूळ, ओले खोबरे, चणा डाळ
कृती
१. कडूनिंबाची पाने एकदम छान धुऊन घ्या. ती छान कोरडी करून घ्या. देठ काढून घ्या.
२. चणाडाळ भिजत घाला. अर्धा तास तरी भिजू द्या. जरा मऊ होऊ द्या.
३. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाने तसेच भिजवलेली डाळ, ओल्या खोबर्याचे तुकडे, गूळ सगळं घ्या.
४. मिक्सरमधून छान वाटून घ्या.
हा प्रसाद ओला होतो. तुम्हाला जर सुका प्रसाद तयार करायचा असेल तर मग गूळाऐवजी साखर वापरू शकता. ओल्या खोबर्याऐवजी सुके खोबरे वापरा. चणा डाळ भिजवू नका थोडी परतून घ्या. आणि मग वाटा असा तयार केलेला प्रसाद सुका होतो. चवीलाही छानच लागतो.