Join us  

वाटीभर रव्याची करा मऊसूत बर्फी, नेहमीपेक्षा वेगळा पदार्थ करायलाही सोपा, टिकतेही जास्त दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2023 11:03 AM

Semolina Barfi Recipe | Ganesh Chaturthi Special Dessert : गोड शिरा नेहमीच खातो, नवीन ट्राय करा रवा बर्फी, सणवार होईल स्पेशल

नागपंचमी झाल्यानंतर एका पाठोपाठ एक सणावाराला सुरुवात होते. आता काही दिवसात गणपती बाप्पा घराघरात विराजमान होतील. या दिवसात गोडाचे पदार्थ केले जातात. मोदक, शिरा, पुरणपोळी, लाडू, खीर हे पदार्थ आवडीने खाल्लेही जातात. आपण गोडाच्या पदार्थांमध्ये अजून एका पदार्थाचा समावेश करू शकता.

या सणावाराच्या दिवसात आपण रवा बर्फी करू शकता. रव्याचा गोड शिरा आपण खाल्लाच असेल. आता रवा बर्फी ट्राय करून पाहा. बर्फीमध्ये अनेक प्रकार केले जातात. जर आपल्याला गोड पदार्थात काहीतरी वेगळं ट्राय करून पाहायचं असेल तर, रवा बर्फी नक्की ट्राय करून पाहा(Semolina Barfi Recipe | Ganesh Chaturthi Special Dessert).

रवा बर्फी करण्यासाठी लागणारं साहित्य

रवा

तूप

साखर

पाणी

इडली डोसा नेहमीचाच, वाटीभर रव्याचा करा इन्स्टंट उत्तप्पा, मुलांच्या टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन

सुकं खोबरं

वेलची पूड

कृती

सर्वप्रथम, कढईत ३ चमचे तूप घाला. तूप विरघळल्यानंतर त्यात एक वाटी रवा घालून भाजून घ्या. रवा खरपूस भाजून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यानंतर कढईत एक वाटी साखर घाला. नंतर ग्लासभर पाणी घाला. पाण्यात साखर विरघळल्यानंतर त्यात भाजलेला रवा घालून मिक्स करा. नंतर त्यात एक कप किसलेलं सुकं खोबरं आणि अर्धा चमचा वेलची पूड घालून चमच्याने मिक्स करा.

तांदूळ नको नी सोडा नको, करा २ डाळींची पौष्टिक इडली, नाश्ता स्पेशल प्रोटीन इडली- सोपी रेसिपी!

मिक्स करून झाल्यानंतर, एका ताटाला चमचाभर तूप लावून ग्रीस करा. व त्यात तयार मिश्रण घालून पसरवा. त्यावर चिरलेला सुका मेवा घालून गार्निश करा. मिश्रण थंड झाल्यानंतर सुरीने वड्या कापून घ्या. अशा प्रकारे चविष्ट रवा बर्फी खाण्यासाठी रेडी. 

टॅग्स :गणेशोत्सवअन्नपाककृती