Join us  

बटाट्याचे नको तर करुन पाहा रव्याचे फ्रेंच फ्राईज, १ वाटी रव्याचा चटकदार पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2023 4:11 PM

Semolina French Fries: Try This Healthy Snack With Family बटाट्याचे फ्रेंच फ्राईज खाऊन वजन वाढण्याची भीती वाटत असेल तर हे वेगळे फ्राईज खाऊन पाहा

सायंकाळ झाली की छोटी भूक प्रत्येकाला लागते. काहींना तर ही छोटी भूक फक्त चमचमीत पदार्थ खाण्यासाठी लागते. संध्याकाळी नाक्यावर, चौकावर चमचमीत पदार्थांचे छोटे स्टॉल लागतात. मोठ्या दुकानात मिळणारे बर्गर, फ्रेंच फ्राईज देखील या स्टॉलवर मिळतात. फ्रेंच फ्राईज बटाट्यापासून तयार होतात, म्हणून काही लोकं खाणं टाळतात.

जर आपल्याला बटाटा खायचं नसेल, किंवा घरी बटाटे उपलब्ध नसतील तर, रव्याचे फ्रेंच फ्राईज करून पाहा. आतापर्यंत आपण रव्याचा उपमा, गोड शिरा, किंवा रव्याचे लाडू खाल्ले असतील, पण आता स्नॅक्सला काहीतरी हटके खायचं असेल तर, ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा(Semolina French Fries: Try This Healthy Snack With Family).

रव्याचे फ्रेंच फ्राईज करण्यासाठी लागणारं साहित्य

रवा

मीठ

पाणी

तेल

लाल तिखट

स्वातंत्र्य दिन विशेष : १ कपभर मैद्याची करा कुरकुरीत जिलेबी! स्वातंत्र्यदिनी जिलेबीचा बेत तर हवाच..

चाट मसाला

काळे मीठ

रेड चिली फ्लेक्स

पिझ्झा सिझनिंग

गार्लिक पावडर

कृती

सर्वप्रथम, पॅनमध्ये एक कप पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात एक कप रवा, चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. रवा चमच्याने ढवळत राहा, व घट्टसर पीठ तयार करा. हे पीठ एका परातीत काढून घ्या, व ज्याप्रमाणे आपण पीठ मळतो, तसे पीठ मळून घ्या.

मुठभर कडीपत्त्याची ५ मिनिटांत करा चमचमीत चटणी, सोपी रेसिपी-चवीला भारी

एक प्लास्टिक कव्हर घ्या, त्यावर हाताने तेल लावून ग्रीस करा. रव्याचं तयार पीठ त्यावर ठेऊन लाटण्याने लाटून घ्या. चाकूने लांबट आकराचे काप करून घ्या. दुसरीकडे कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर रव्याचे लांबट आकाराचे काप तळून घ्या. तळलेले फ्रेंच फ्राईज एका बाऊलमध्ये काढून ठेवा. याची चव आणखी  वाढवण्यासाठी त्यात मसाले मिक्स करा.

तळलेल्या फ्रेंच फ्राईजवर अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा चाट मसाला, चवीनुसार काळे मीठ, रेड चिली फ्लेक्स, पिझ्झा सिझनिंग, व अर्धा चमचा गार्लिक पावडर घालून मिक्स करा. अशा प्रकारे रव्याचे क्रिस्पी फ्रेंच फ्राईज खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स