Lokmat Sakhi >Food > तीळ-अळीव-सूर्यफूल-भोपळा- इटुकल्या बिया ठरतात एनर्जीचा ‘सुपरडोस!’ रोजच्या जेवणातली चमचाभर जादू

तीळ-अळीव-सूर्यफूल-भोपळा- इटुकल्या बिया ठरतात एनर्जीचा ‘सुपरडोस!’ रोजच्या जेवणातली चमचाभर जादू

आपण महागडे पदार्थ खातो आणि आपल्याला परवडतील अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, बियांचे तेच होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2023 08:30 AM2023-12-16T08:30:00+5:302023-12-16T08:30:02+5:30

आपण महागडे पदार्थ खातो आणि आपल्याला परवडतील अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, बियांचे तेच होते.

Sesame-sunflower-pumpkin seeds are a 'superdose' of energy! A spoonful of magic in the daily meal-superfood | तीळ-अळीव-सूर्यफूल-भोपळा- इटुकल्या बिया ठरतात एनर्जीचा ‘सुपरडोस!’ रोजच्या जेवणातली चमचाभर जादू

तीळ-अळीव-सूर्यफूल-भोपळा- इटुकल्या बिया ठरतात एनर्जीचा ‘सुपरडोस!’ रोजच्या जेवणातली चमचाभर जादू

Highlightsॲनिमिया असलेल्या महिलांनाही त्यांचा उत्तम उपयोग होतो.

राजगीरा किंवा शेंगदाणे गुळाची चिक्की मिळतेच. अनेकजण हल्ली प्रोटीनबार खातात. मात्र गुळ नको, साखर नको याकाळात प्रोटीनबारही शुगर फ्री हवे असतात.. ते सोबत न्यायला सोपे. पोटभरीचे असतात. आणि मुख्य म्हणजे प्रोटीन खाणं वाढवा हा जो सध्याचा गजर आहे त्यात ते सामावले जातात. पण प्रोटीन बार महाग मिळतात. आपल्याला घरच्याघरीही हे प्रोटीनबार करता येऊ शकतात.

भोपळ्याच्या बिया, अळीव, अळशी, तीळ, चिया सिड्स, सूर्यफुलाच्या बिया हे सगळं सहज उपलब्ध होतं. त्यात जरा सुकामेवा घातला तर अजून पौष्टिक होतं. त्यामुळे एरव्ही आपण चिकी करतो तशी या बियांची चिकी करायची की झाले प्रोटीन बार तयार. आवडत असेल तर त्यात चोको पावडर, खजूरही घालता येतं. मधही घालता येतं.

(Image :google)

त्याची अशी काही सेट रेसिपी नाही तुम्ही कराल ते कॉम्बिनेशन आणि जी कराल ती चव.
एक मात्र नक्की हे प्रोटीन बार अत्यंत पौष्टिक होतात आणि बाहेरच्या महागड्या प्रोटीन आणि एनर्जी बारपेक्षा अतिशय उपयोगी ठरतात. लहान मुलं, आजीआजोबा यांच्यासह ॲनिमिया असलेल्या महिलांनाही त्यांचा उत्तम उपयोग होतो. अनेक ऑनलाइन व्हिडिओही यासंदर्भात सहज उपलब्ध आहे.

मात्र यातलं सूत्र एकच की बिया फार महत्त्वाच्या आहेत, त्या आपल्या आहारात असणं गरजेचंही आहे.
चटणी खा, एनर्जी बार करा, सॅलेडमध्ये बिया वापरा मात्र त्यांचा आहारातला वापर तब्येत नक्की सुधारते. काही आजार असल्यास मात्र तुमच्या आहार तज्ज्ञांचा आणि डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्या.


 

Web Title: Sesame-sunflower-pumpkin seeds are a 'superdose' of energy! A spoonful of magic in the daily meal-superfood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.