Lokmat Sakhi >Food > हिवाळ्यात दही विरजताना लक्षात ठेवा ३ गोष्टी, पातळ-पाणचट न होता विकतसारखे घट्ट दही होईल तयार...

हिवाळ्यात दही विरजताना लक्षात ठेवा ३ गोष्टी, पातळ-पाणचट न होता विकतसारखे घट्ट दही होईल तयार...

How To Set Curd In Winter 7 Easy Tips : Useful tips to help set curd in winters : How to make curd in winter season : थंडीच्या दिवसात घरच्याघरी दही तयार करताना या चुका टाळा, दही होईल अगदी परफेक्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2024 06:19 PM2024-11-27T18:19:55+5:302024-11-27T18:25:52+5:30

How To Set Curd In Winter 7 Easy Tips : Useful tips to help set curd in winters : How to make curd in winter season : थंडीच्या दिवसात घरच्याघरी दही तयार करताना या चुका टाळा, दही होईल अगदी परफेक्ट...

Setting Curd In Winter Just Got Easy With These 3 Tips & Tricks How To Set Curd In Winter 7 Easy Tips Useful tips to help set curd in winters How to make curd in winter season | हिवाळ्यात दही विरजताना लक्षात ठेवा ३ गोष्टी, पातळ-पाणचट न होता विकतसारखे घट्ट दही होईल तयार...

हिवाळ्यात दही विरजताना लक्षात ठेवा ३ गोष्टी, पातळ-पाणचट न होता विकतसारखे घट्ट दही होईल तयार...

आपल्या रोजच्या आहारात दही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. भारतीय स्वयंपाकामध्ये कढी, ताक, मठ्ठा, कोशिंबिरीमध्ये दह्याचा वापर केला जातो. निरोगी आणि सृदृढ शरीरप्रकृतीसाठी दररोजच्या आहारात कमीतकमी एक वाटी दह्याचा जरूर समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. सध्या बाजारात विविध ब्रॅन्डचे फ्लेवर्ड दही सहज उपलब्ध होते. परंतु घरी बनवलेल्या दह्याची चव आणि ते खाण्याची गंमत काही वेगळीच असते. काहीवेळा आपण बाहेरुन विकतचे   दही आणतो, मात्र हे दही बऱ्याचदा प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा डब्यांतून दिले जाते. बाहेरुन विकत आणलेले दही कधी पातळ, पाणचट किंवा आंबट असते. त्यामुळे घरीच दही तयार करणं हे नेहमीच चांगलं(How to make curd in winter season).

मुळात दही तयार करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अगदी पाच ते दहा मिनीटांमध्ये (Useful tips to help set curd in winters) आपण दह्याला विरजण लावू शकता. मात्र कधी कधी घरी लावलेलं दही घट्ट तयार होत नाही. याचबरोबर, शक्यतो हिवाळ्यात दही व्यवस्थित लागत नाही. दही जर घट्ट आणि चवीला अगदी परफेक्ट झाले तरच ते खायला चांगलं लागत. हिवाळ्यात दही लावताना लक्षात ठेवा फक्त ४ टिप्स. घरी लावलेले दही होईल विकतसारखे घट्ट आणि चवीला उत्तम(How To Set Curd In Winter 7 Easy Tips).

दही लावताना लक्षात ठेवा... 

१. दही लावण्यासाठी काचेच्या किंवा चिनीमातीच्या भांड्यांचाच वापर करावा. 

दही लावताना नेहमी काचेच्या किंवा चिनीमातीच्या भांड्यांचाच वापर करावा. याचबरोबर, दही लावण्यासाठी दूध मातीच्या जाड मडक्यात किंवा हंडीमध्ये साठवा. कारण, या भांड्यात उष्णता जास्त काळ टिकून राहते. यामुळे हिवाळ्यात दही लावताना काचेच्या किंवा चिनीमातीच्या भांड्यांचाच वापर करावा. 

२. थंडीच्या दिवसांत दूध थोडं जास्त गरम करायचं. 

थंडीच्या दिवसांत वातावरणातील गारठ्यामुळे काहीवेळा दही व्यवस्थित लागत नाही. अशावेळी दूध थोडं जास्त गरम करावं. जर उन्हाळ्यात दही लावणार असाल तर कोमट दुधाचा वापर करावा. हिवाळ्यात वातावरणातील गारठ्यामुळे विरजण लावताना दूध थोडे नेहमीपेक्षा जास्त गरम करून घ्यावे. 

खवलेलं नारळ फ्रिजमध्ये ठेवलं तरी सुकतंच? ‘हा’ पदार्थ कालवून ठेवा, खवट न होता टिकेल खूप दिवस...

हिंदी सिनेमात गाजलेले ‘मुली के पराठे’ हिवाळ्यात तर खायलाच हवे, पाहा सोपी आणि पौष्टिक रेसिपी...

३. ज्या भांड्यामध्ये दही लावायचं आहे त्या भांड्यामध्ये दही फेटून घ्यायचं. 

हिवाळ्याच्या दिवसात दही लावताना ते पातळ, पाणचट होऊ नये यासाठी दही लावायच्या भांड्यांमध्ये दही फेटून घ्यायचं. दही फेटून घेतल्यामुळे ते सगळीकडे छान पसरत आणि दही छान लागत. 

४. दही ज्या भांड्यात लावले आहे ते भांडे गरम किंवा उबदार ठिकाणी ठेवावे. 

हिवाळयात दही लावल्यानंतर ते भांडे अशा ठिकाणी ठेवा जिथे त्याला उबदारपणा मिळेल.  यासाठी आपण गरम चपात्या बनवण्याच्या ठिकाणी, किंवा जेवण बनवण्याच्या ठिकाणी ठेवू शकता. हे भांडे लोकरीच्या कपड्यात गुंडाळून पिठाच्या डब्यात किंवा कुकरच्या भांड्यामध्ये देखील ठेवू शकता. घरी मायक्रोवेव्ह असेल, तर दही ज्या भांड्यात लावणार ते भांडे दोन मिनिटांसाठी गरम करून घ्या, नंतर भांडे नीट बंद करून ठेवा. एकदा त्या भांड्यात दही लावण्यासाठी सेट झाली की भांडे पुन्हा हलवू नये. 

हिवाळ्यात इडलीचे पीठ आंबत नाही? ३ टिप्स, सोडा न घालताही पीठ फुलेल भरभर, इडल्या होतील हलक्या...


हिवाळ्यात लोणी लवकर निघत नाही? करा फक्त ३ गोष्टी- झटपट निघेल लोणी-तूपही भरपूर रवाळ...

इतरही गोष्टी लक्षात ठेवा... 

१. दूध घालण्याआधी विरजण नीट फेटून घ्या. त्यामुळे दही नीट बनेल नाहीतर गुठळ्या तयार होतात.
२. तुम्ही वापरत असलेले विरजण आंबट नसल्याची खात्री करा.
३. हिवाळ्यात दही बनव्यासाठी तुम्हाला जास्त विरजण लागेल. त्याचबरोबर उन्हाळापेक्षा हिवाळ्यात दही बनण्यासाठी वेळही जास्त लागतो.
४. घट्ट दही हवे असेल तर फुल क्रिम किंवा साय असलेले दूध घ्यावे.

Web Title: Setting Curd In Winter Just Got Easy With These 3 Tips & Tricks How To Set Curd In Winter 7 Easy Tips Useful tips to help set curd in winters How to make curd in winter season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.