Join us  

नवरात्र स्पेशल : नवरात्राच्या उपवासाला करा घट्ट रबडीसारखी साबुदाण्याची खीर; पाहा सोपी रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 12:44 PM

Shardiya Navratri 2023 Sabudana Kheer Recipe (Sabudanyachi kheer) : नेहमी नेहमी खिचडी खायला नको वाटते. अशावेळी तुम्ही साबुदाण्याची खीर बनवू शकता.

नवरात्रीचा (Navratri 2023) सण भारतभरात जल्लोषात साजरा केला जातो. नवरात्रीचे नऊ दिवस भक्त-भाविक मोठ्या श्रद्धेने उपवास ठेवतात. देवीची पूजा अर्चा करतात. काहीजण ९ दिवस निर्जळी उपवास करतात, काही फळांचा आणि दूधाचा आहार घेतात. तर काहीजण साबुदाणा, बटाटा, शेंगदाणे अशा उपवासाच्या पदार्थांचा आहारात समावेश करतात. (Sabudana Kheer Recipe)

या उपवासांचा तब्येतीला कोणताही त्रास होऊ नये यासाठी तुम्ही साबुदाण्याचे पौष्टीक पदार्थ बनवून उपवासाच्या दिवशी याचे सेवन करू शकता. नेहमी नेहमी खिचडी खायला नको वाटते. अशावेळी तुम्ही साबुदाण्याची खीर बनवू शकता. (Easy Sabudana Kheer Recipe) नैवेद्यासाठीही हा पदार्थ उत्तम पर्याय आहे. साबुदाण्याची खीर गचगचीत होते, परफेक्ट टेक्स्चर येत नाही अशी अनेकांची तक्रार असते. साबुदाण्याची खिचडी करण्याची सोपी रेसिपी पाहूया.

साबुदाण्याची खीर कशी करायची (How to Make Sabudana Kheer)

१) एक  कप साबुदाणा भिजवून घ्या.  त्यात एक कप ते दीड कप पाणी घालून स्वच्छ धुवून घ्या. साबुदाणे धुताना जास्त रगडू नका. अन्यथा त्यांचा आकार लहान होऊ शकतो. धुवून झाल्यानंतर अर्धा कप पाणी घालून साबुदाणे १ ते २ तासांसाठी झाकण ठेवून भिजवायला ठेवा. 

२) एक कढई गॅसवर ठेवा. त्यात दूध उकळण्यासाठी ठेवा.  थोड्या वेळाने साबुदाणे भिजल्यानंतर त्यात १ चमचा तूप घालून एकजीव करून घ्या. यामुळे साबुदाणे चिकट होत नाहीत. दूध गरम होत असताना चमच्याच्या साहाय्याने ढवळत राहा नाहीतर दूध खाली भांड्याला लागू शकतं.

३) एका पॅनमध्ये एक ग्लास पाणी गरम करा. पाणी उकळायला लागल्यानंतर त्यात भिजवून घेतलेले साबुदाणे घाला आणि गॅस बंद करा. २ ते ३ मिनिटांनी साबुदाणा फुलेल आणि ट्रांसपरंट दिसून येईल. नंतर गाळणीत साबुदाणे घालून त्यातलं पाणी काढून घ्या. यामुळे एक्स्ट्रा पाणी आणि स्ट्रार्च निघून जाईल. दूध घट्ट झाल्यानंतर त्यात  साबुदाणा घाला. यामुळे साबुदाणा चिकट होणार नाही ना दूध फाटणार

४) २ ते ३ मिनिटं साबुदाणा दूधात शिजवल्यानंतर त्यात साखर घाला. नंतर पुन्हा ५ ते ७ मिनिटं शिजवून घ्या. खीर सतत ढवळत राहा. यात बारीक केलेले काजू, बदाम, पिस्ता घाला. फ्लेवरसाठी त्यात वेलची पावडर घाला.

५) दूध घट्ट होईपर्यंत मंद आचेवर शिजवून घ्या.  त्यावरची साय दुधात एकत्र करत राहा. नंतर गॅस बंद करा.  क्रिमी, रबडीदार साबुदाणा खीर तयार आहे. ही खीर नैवेद्यासाठी उत्तम पर्याय आहे.  तुम्ही सणाच्या दिवशीही झटपट हा गोड पदार्थ करू शकता. 

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव 2023नवरात्री उपवास आणि पदार्थ २०२३अन्न