Lokmat Sakhi >Food > फक्त १० मिनिटांत करा शेवगा फ्राय, तोंडी लावण्यासाठी पौष्टिक पदार्थ, खा मनसोक्त...

फक्त १० मिनिटांत करा शेवगा फ्राय, तोंडी लावण्यासाठी पौष्टिक पदार्थ, खा मनसोक्त...

Shevga Fry Recipe : Drumstick Fry : Moringa Fry : Crispy Moringa Fry : How To Make Shevga Fry At Home : शेवग्याच्या शेंगांची भाजी, सूप तर आपण खातोच पण जेवताना तोंडी लावायला म्हणून करा चमचमीत शेंगा फ्राय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2025 17:02 IST2025-03-08T16:46:30+5:302025-03-08T17:02:06+5:30

Shevga Fry Recipe : Drumstick Fry : Moringa Fry : Crispy Moringa Fry : How To Make Shevga Fry At Home : शेवग्याच्या शेंगांची भाजी, सूप तर आपण खातोच पण जेवताना तोंडी लावायला म्हणून करा चमचमीत शेंगा फ्राय...

Shevga Fry Recipe Drumstick Fry Moringa Fry How To Make Shevga Fry At Home | फक्त १० मिनिटांत करा शेवगा फ्राय, तोंडी लावण्यासाठी पौष्टिक पदार्थ, खा मनसोक्त...

फक्त १० मिनिटांत करा शेवगा फ्राय, तोंडी लावण्यासाठी पौष्टिक पदार्थ, खा मनसोक्त...

आपल्या भारतीय जेवणाच्या थाळीत तोंडी लावण्यासाठीच्या पदार्थांचा एक वेगळाच थाट असतो. जेवणाच्या ताटात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तोंडी लावण्यासाठी दिले जातात. खरंतर, या तोंडी लावण्यासाठीच्या पदार्थांमुळेच आपले जेवण अगदी मस्तपैकी साग्रसंगीत पार पडते. आपल्या जेवणाच्या ताटात सुकी किंवा (Shevga Fry Recipe) ओली चटणी, मुरांबा, लोणची, पापड, यांसारखे असंख्य पदार्थ तोंडी लावायला हमखास असतात. अनेकदा जेवणात (Crispy Moringa Fry) नावडती भाजी असली की बहुतेकवेळा (Drumstick Fry) या तोंडी लावण्यासाठीच्या पदार्थांसोबतच चपाती किंवा भात खाल्ला जातो. यासाठीच ताटात हे तोंडी लावण्यासाठीचे पदार्थ असणे गरजेचे असते(How To Make Shevga Fry At Home).

परंतु लोणची, मुरांबा, पापड यांसारख्या पदार्थांमध्ये बऱ्याच प्रमाणांत साखर, मीठ असते, त्यामुळे असे पदार्थ रोज खाणे शरीराला हानिकारक ठरु शकते. यासाठी जेवणात तोंडी लावण्यासाठी म्हणून आपण काहीतरी पौष्टिक किंवा हेल्दी पदार्थ देखील खाऊ शकतो. अशावेळी आपण शेवग्याच्या शेंगा फ्राय हा अगदी १० मिनिटांत तयार होणारा पौष्टिक पदार्थ खाऊ शकतो. शेवग्याच्या शेंगा या आपल्या आरोग्यासाठी फारच फायदेशीर असतात. यासाठीच, आपण हा झटपट होणारा शेवग्याच्या शेंगांचा पौष्टिक पदार्थ तोंडी लावण्यासाठी म्हणून कसा करायचा ते पाहा.  

साहित्य :- 

१. तेल - १ टेबलस्पून 
२. जिरे - १/२ टेबलस्पून 
३. हळद - १/२ टेबलस्पून 
४. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून 
५. मीठ - चवीनुसार
६. शेवग्याच्या शेंगा - २ शेंगा 
७. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली) 

विकतसारखे मसाला ताक करण्यासाठी घरीच करा वर्षभर टिकणारा सिक्रेट मसाला, ताकाची चव वाढेल दुप्पट...


आज नाश्त्याला काय करायचं? हे घ्या उत्तर-पाहा नाश्त्याचे १० झटपट पदार्थ, स्कुल टिफिनसाठीही मस्त...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी शेंगा स्वच्छ धुवून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. आता या शेंगांवरील जास्तीची जाड सालं काढून शेंगा स्वच्छ करून घ्याव्यात. 
२. आता एका पॅनमध्ये थोडे तेल घेऊन त्यात जिरे, हळद, लाल तिखट मसाला व चवीनुसार मीठ घालावे.
३. ही खमंग फोडणी तयार झाल्यावर यात शेवग्याच्या शेंगा घालाव्यात. 

४. आता या शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित खमंग फोडणीत परतवून घ्याव्यात. 
५. त्यानंतर झाकण ठेवून ५ येत १० मिनिटे एक हलकीशी वाफ काढून घ्यावी. 
६. सगळ्यांत शेवटी वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घालावी. 

मस्त चमचमीत तोंडी लावण्यासाठी शेवग्याच्या शेंगा फ्राय खाण्यासाठी तयार आहे.

Web Title: Shevga Fry Recipe Drumstick Fry Moringa Fry How To Make Shevga Fry At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.