उन्हाळा जरा सुसह्य करण्यासाठी आपण सरबत, ताक, फळांचे रस अशी वेगवेगळी पेयं नेहमीच घेत असतो. हे पदार्थ करण्यासाठी जर थोडी खास रेसिपी ट्राय केली तर नक्कीच त्याची चव आणखी वाढते आणि उन्हाळ्यातही छान रसनातृप्ती होते. आता ताक किंवा मसाला ताक तर आपण नेहमीच करतो (masala chaas recipe). पण तरीही त्या नेहमीच्याच ताकाला अधिक पौष्टिक आणि चवदार करण्यासाठी ही थोडी वेगळी रेसिपी ट्राय करून पाहा (how to make masala tak in marathi). अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने ही रेसिपी सांगितली आहे. (Shilpa Shetty's Favourite Summer Drink Mint ButterMilk Recipe)
मसाला ताक करण्याची रेसिपी
शिल्पा शेट्टी तिच्या आहाराबाबत, फिटनेसबाबत खूप जास्त जागरुक असते. त्यामुळे तिने शेअर केलेली ही रेसिपी नक्कीच जास्त पौष्टिक असणार. ती तिच्या घरी कशा पद्धतीने मसाला ताक करते ते पाहूया...
साहित्य
अर्धी वाटी दही
डायबिटिस असेल तर नेमकी कोणती भाकरी खावी? ज्वारीची की बाजरीची?- डॉक्टर सांगतात.....
अर्धा टिस्पून बडिशेप पावडर
अर्धा टिस्पून जीरे पावडर
अर्धा कप कोथिंबीर
ऑफिससाठी फॉर्मल लूक देणारं ब्लाऊज शिवायचंय? ७ सुंदर 'नेक डिझाईन्स'- दिसाल स्टायलिश, आकर्षक
पुदिन्याची ८ ते १० पाने
१ वाटी पाणी
चवीनुसार मीठ
१ हिरवी मिरची
कृती
१. सगळ्यात आधी तर जीरे आणि बडिशेप भाजून घ्या आणि त्याची पावडर करून घ्या.
२. कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.
मेकअप चेहऱ्यावर थापल्यासारखा दिसतो? चेहरा भुरकट- काळा होतो? मेकअप परफेक्ट होण्यासाठी ३ टिप्स
३. पुदिन्याची पानंही बारीक चिरून घ्या.
४. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना, जीरेपूड आणि बडिशेप पूड, मिरची टाका आणि मिक्सरमधून हे मिश्रण चांंगलं बारीक फिरवून घ्या.
५. मिक्सरमधून बारीक केलेलं हे मिश्रण गाळून घ्या. आता त्यामध्ये दही आणि थोडं पाणी टाका. सगळं मिश्रण पुन्हा एकदा मिक्सर किंवा ब्लेंडरने चांगलं फेटून घेतलं की त्यात चवीनुसार मीठ टाका. गारेगार पौष्टिक ताक तयार.