हळदीचे दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे शरीराला हळद आणि दूध या दोन्हीतील पोषक तत्व मिळतात, जे निरोगी राहण्यासाठी आवश्यक असतात. (Turmeric milk benefits in marathi) हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन तत्व आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हळद हृदयाचे आरोग्य सुधारते, कर्करोगापासूनही संरक्षण करते. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. हळद नैराश्य आणि सांधेदुखीची लक्षणे कमी करण्यास मदत करते. हळद दूध कॅल्शियम, प्रोटीनचा उत्कृष्ट स्रोत आहे. त्यामुळे हाडे मजबूत होतात, शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. (Can we drink turmeric milk daily in summer) उन्हाळ्यात हळदीचे दूध पिण्याचे काय फायदे आहेत, उन्हाळ्यात हळदीचे दूध पिण्याचे काय तोटे होतात? या प्रश्नांबाबत डॉ हनी सावला, (सल्लागार इंटरनल मेडिसिन, वोक्हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल) यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना अधिक माहिती दिली आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात हळदीचं दूध प्यायंच की नाही?
डॉक्टर हनी सावला सांगतात की, ''हिवाळ्यात हळदीचे दूध न पिण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो, पण याचा अर्थ उन्हाळ्यात हळदीचे दूध पिणे योग्य नाही असे नाही. उन्हाळ्यातही तुम्ही हळदीचे दूध पिऊ शकता. हळदीमुळे शरीरातील उष्णता वाढते असे म्हटले जाते, पण यात पूर्णपणे तथ्य नाही. हळद शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. हळदीमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात, तसेच पचनक्रिया सुधारते. हळदीचे दूध प्यायल्याने वजनही नियंत्रणात राहते. हळद शरीरावर नैसर्गिकरित्या कार्य करते, आरोग्यास लवकर हानी पोहोचवत नाही.''
उन्हाळ्यात हळदीचं दूध पिण्याचे फायदे ((Turmeric Milk benefits in summer)
१) हळदीचे दूध प्यायल्याने गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता यांसारख्या पचनाच्या समस्यांमध्ये आराम मिळतो.
२) हळदीचे दूध प्यायल्याने वजनही नियंत्रणात ठेवता येते. तुम्ही हळदीचे दूध घट्ट आणि पातळ अशा दोन्ही स्वरूपता घेऊ शकता.
३) हळदीचे दूध प्यायल्याने त्वचेशी संबंधित समस्याही दूर होतात. त्यामुळे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात, त्वचा चमकदार होते.
४) हळदीचे दूध प्यायल्याने जखमाही लवकर बऱ्या होतात. हळदीमध्ये असलेले अँटी-सेप्टिक तत्व जखमा लवकर भरण्यास मदत करतात.
५) हळदीचे दूध नैराश्य आणि सांधेदुखीची लक्षणे कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
६) हळदीचे दूध प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. शरीराला विविध रोगांशी लढण्याची शक्ती मिळते.
हळदीचं दूध पिण्याचे नुकसान (Turmeric Milk Side Effects in Summer)
1) आयुर्वेदानुसार हळदीचा प्रभाव उष्ण असल्याचे सांगितले आहे. अशा स्थितीत, उष्ण हवामानात याचे अतिसेवन शरीराला हानी पोहोचवू शकते.
2) हळदीच्या दुधाचे फायदे मिळवण्यासाठी तुम्ही हळद कमी प्रमाणात वापरावी. दिवसातून एक ग्लास हळदीचे दूध प्यायले जाऊ शकते. हळदीचे दूध आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे, पण ते कोणत्याही आजारावरचा पूर्ण इलाज नाही.
3) जर तुम्हाला हळदीच्या दुधाची ऍलर्जी असेल किंवा तुम्हाल लॅक्टोज एलर्जेटीक असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हळदीच्या दूधाचे सेवन करा.