उन्हाळा सुरु झाला, या दिवसात शरीराची प्रचंड लाहीलाही होते. शरीराला थंडावा मिळावा यासाठी आपण अनेक पदार्थ खातो. ज्यात दहीचा समावेश आहे. दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दही प्रोटीन, कॅल्शियम, रायबोफ्लेविन, विटॅमिन B6 आणि विटॅमिन B12 ने युक्त असते. जेवणासोबत दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. ज्यामुळे जेवणाचा केवळ स्वाद वाढत नाही, तर पचनशक्ती सुद्धा मजबूत होते. दहीसोबत आपण साखर किंवा मीठ मिसळून खातो. पण दहीसोबत नेमकं मीठ खावं की साखर हा प्रश्न अनेकांना पडलाच असेल.
दह्यात काय मिसळून खाल्ल्याने शरीराला फायदा होतो? यासंदर्भात, यूपीच्या अलिगढ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या असोसिएट प्रोफेसर डॉ. सरोज गौतम सांगतात, '' उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी दही खाल्लं जातं, परंतु दह्याचा प्रभाव उष्ण असतो. त्याची प्रकृती आम्लयुक्त असून, त्यात काहीही मिसळल्याशिवाय खाऊ नये. साधे दही आपले रक्त दूषित करू शकते, ज्यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात''(Should we eat curd with salt or sugar?).
दह्यात मीठ मिसळून खावे की साखर?
डॉक्टर सरोज यांच्या मते, ''दह्यामध्ये नियमित मीठ घालून खाऊ नये, दह्याचा प्रभाव गरम असतो. त्यात मीठ जास्त टाकल्याने त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. यासह केस गळणे, केस अकाली पांढरे होणे, त्वचेवर पिंपल्स येऊ शकतात. त्यामुळे दह्यात मीठ घालून खाणे टाळा. तर, दह्यात साखर मिसळून खाणे खूप फायदेशीर मानले जाते. दह्यामध्ये साखर घातल्यास त्याचा प्रभाव थंड होतो. दह्यात गूळ मिसळणे देखील खूप फायदेशीर आहे.''
नाकातले केस दिसतात म्हणून वैतागलात? ४ उपाय - तज्ज्ञांचा सल्ला मात्र घ्या कारण..
दह्याची लस्सी फायदेशीर
डॉक्टर सांगतात, ''उन्हाळ्यात दह्याची लस्सी बनवून पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. दह्यात साखर मिसळली की त्याचा प्रभाव थंड होतो. लस्सीचे सेवन केल्याने उष्णतेपासून आराम मिळतो. यासोबतच शरीरात ऊर्जा येते आणि ताजेपणा जाणवतो. लस्सी प्यायल्याने आपले शरीरही हायड्रेट राहते, व पाण्याची कमतरता भासत नाही. मात्र, अतिसेवन टाळावे, जेणेकरून आरोग्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही.''