Benefits Of Eating Too Much Jackfruit: उन्हाळा येताच वेगवेगळ्या भाज्या खायला मिळतात. यात फणसाचाही समावेश आहे. फणसाच्या भाजीसोबतच यापासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. बरेच लोक फणस किंवा फणसाची भाजी आवडीने खातात. फणस आरोग्यासाठीही फार फायदेशीर असतं.
फणसातून शरीराला वेगवेगळे व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन आणि अॅंटी-ऑक्सीडेंट भरपूर मिळतात. यात व्हिटॅमिन बी जसे की, रायबोफ्लेविन, थियामिनसोबतच मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, कॉपर, मॅगनीज आणि फायबर असतं. पण उन्हाळ्यात फसण खावं की नाही याबाबत लोक कन्फ्यूज असतात. पण खरंच उन्हाळ्यात फणस खाल्ल्याने नुकसान होतं का आणि त्याचे फायदे काय हे जाणून घेऊ...
उन्हाळ्यात फणस खावं की नाही?
काही लोकांना असं वाटतं की, उन्हाळ्यात फणस खाल्ल्याने शरीरात जास्त उष्णता वाढते. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात याचं सेवन टाळतात. पण नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, फणस शरीरात उष्णता वाढवत नाही. उलट यातील पोषक तत्व त्वचेपासून ते आरोग्याला वेगवेगळे फायदे देतात. तुम्ही बिनधास्त होऊ उन्हाळ्यात याचं सेवन करू शकता. पण खूप जास्तही खाऊ नये.
फणस खाण्याचे फायदे
1) थायरॉईडपासून आराम
फळांमधून शरीराला मिनरल्सचा पुरवठा होतो. फणसामध्ये कॉपर भरपूर प्रमाणात असतं. त्याचा फायदा थायरॉईडचा त्रास आटोक्यात ठेवला जातो. शरीरातील थायरॉईड हार्मोन्स नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
2) रोगप्रतिकारक शक्ती वाढते
व्हिटॅमिन सी युक्त फळं खाल्ल्यानं नैसर्गिकरित्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. फणसामध्ये व्हिटॅमिन सी सोबतच साखरही मुबलक असते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
3) ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं
दिवसभरातील शरीराला आवश्यक पोटॅशियमच्या गरजेपैकी 14% गरज केवळ वाटीभर फणसाच्या गरामधून मिळतं. पोटॅशिअमयुक्त हे फळ ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं.
4) पचन सुधारतं
फणसामध्ये डाएटरी फायबर आणि पाण्याचे प्रमाणही मुबलक असतं. यामुळे पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. आयुर्वेदानुसार, कच्चं फणस पचनक्रियेचा त्रास असणार्यांसाठी पचायला कठीण, त्रासदायक ठरू शकतं.
5) कॅन्सरचा धोका कमी होतो
फणसामधील अॅंटी-ऑक्सिडंट फ्री रॅडिकल्सचा धोका कमी करतात. फणसाचा गर चिकट आणि स्टार्ची असल्याने आतड्यांमधील घातक घटक बाहेर काढण्यास, पचनक्रिया सुधाण्यास मदत करतात.