Lokmat Sakhi >Food > डाळ शिजवताना येणारा पांढरा फेस काढावा की काढू नये ? पाहा नेमका हा फेस असतो तरी कसला...

डाळ शिजवताना येणारा पांढरा फेस काढावा की काढू नये ? पाहा नेमका हा फेस असतो तरी कसला...

We Be Concerned About Froth Created When Dal Is Cooking? : आपण जेवणात रोज डाळ खातोच परंतु या डाळी शिजवताना त्यावर पांढराशुभ्र फेस कसा येतो, तो आरोग्याच्या दृष्टीने चांगला की वाईट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2023 07:15 PM2023-07-06T19:15:30+5:302023-07-06T19:27:25+5:30

We Be Concerned About Froth Created When Dal Is Cooking? : आपण जेवणात रोज डाळ खातोच परंतु या डाळी शिजवताना त्यावर पांढराशुभ्र फेस कसा येतो, तो आरोग्याच्या दृष्टीने चांगला की वाईट?

Should we worry about the foamy substance released while cooking dals | डाळ शिजवताना येणारा पांढरा फेस काढावा की काढू नये ? पाहा नेमका हा फेस असतो तरी कसला...

डाळ शिजवताना येणारा पांढरा फेस काढावा की काढू नये ? पाहा नेमका हा फेस असतो तरी कसला...

भारतीय जेवणाची थाळी म्हटली की त्यात डाळ, भात, चपाती, भाजी, कोशिंबीर असे अनेक पदार्थ असतात. या सगळ्या पदार्थांशिवाय भारतीय थाळी पूर्णच होऊ शकत नाही. डाळ हा आपल्या रोजच्या आहारातील सर्वात महत्वाचा पदार्थ आहे. आपण ताटातल्या डाळीसोबत चपाती किंवा भात दोन्ही खाऊ शकतो. डाळीला भारतीय संपूर्ण आहारातील प्राण म्हटले तरी काही चुकीचे ठरणार नाही. जवळपास दररोज प्रत्येक घरात कुठली ना कुठली डाळ तयार केली जाते. डाळ चवीला  जितकी स्वादिष्ट आहे तितकीच ती आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे, कारण डाळीमधून शरीरातील प्रोटीनची कमतरता पूर्ण केली जाते. 

डाळ तयार करताना ती सर्वप्रथम शिजवून घेतली जाते त्यानंतर या डाळीला खमंग फोडणी दिली जाते. फोडणी दिल्यानंतर डाळ तयार होत असताना त्यावर एक प्रकारचा फेस तयार होतो. आपल्यापैकी सगळ्याच गृहिणींनी हा अनुभव घेतला असेल. डाळ शिजत असताना त्यावर येणारा हा पांढऱ्या रंगाचा फेस आपल्या शरीरासाठी अपायकारक असतो. डाळीवर येणाऱ्या या पांढऱ्या फेसकडे सहसा आपले लक्ष जात नाही. परंतु डाळींवर हा फेस नक्की येतो कुठून आणि तो आरोग्यासाठी कसा हानिकारक आहे, असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतील. याबद्दल माहिती घेऊयात(Should we worry about the foamy substance released while cooking dals).

डाळ शिजवत असताना त्याला पांढरा शुभ्र फेस का येतो? 

शिजणाऱ्या डाळीवर हा फेस तयार होतो सपोनिन (Saponins) नावाच्या अँटीन्यूट्रिअन्टमुळे (Antinutrient). साधारण डाळी आणि तेलबिया यामध्ये हे असते, प्रत्येकात त्याचे प्रमाण वेगवेगळे असते. डाळी नुसत्या भिजवून ठेवल्या आणि त्याला थोडंसं मिक्स केलं तर पाण्यावर फेस तयार होताना दिसून येतो. सोयाबीनमध्ये जास्त प्रमाणात सपोनिन (Saponins) असते. सपोनिन (Saponins) चे प्रमाण आहारात जास्त झाले तर मळमळ, उलट्या होतात. त्यामुळे आपण डाळी शिजवण्याआधी त्या भिजवून घेतो, यामुळे सपोनिन (Saponins) पाण्यावाटे बाहेर टाकले जातात. डाळ शिजवताना फेस तयार होत असेल तर त्याचा अर्थ हा की डाळ पूर्णतः भिजवली गेली नाही. डाळ भिजवून त्यातले पाणी काढून , धुवून मगच ती शिजवायला घ्यायला हवी. डाळीमध्ये फक्त हे एवढ्या एकाच प्रकारचे अँटीन्यूट्रिअन्टमुळे (Antinutrient) नसतात. वेगवेगळ्या डाळींमध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत. त्यांची रासायनिक रचना, आपल्या शरीरात बदल करण्याची पद्धत यावरून त्यांचे वेगवेगळे वर्गीकरण केले जाते. 

रोज चपात्या करायचा कंटाळा येतो? १ सोपी इन्स्टंट ट्रिक...चपात्या होतील झटपट...

स्टफ पराठा देताना फुटतो, पोळपाटाला चिकटतो? ५ टिप्स, पराठा लाटा झटपट...

डाळींमधील हे अनावश्यक घटक कसे काढले जाऊ शकतात ?

१. डाळी न शिजवता खाणे टाळावे.

२. १००°c पेक्षा जास्त तापमानाला डाळ उकळवणे. जे आपण साधारण रोजच्या स्वयंपाकात करतो. 

३. डाळी कोरड्या भाजणे. 

४. काही डाळींना किंवा कडधान्यांना मोड आणून मगच खाण्याला प्राधान्य द्यावे. 

५. डाळ बनवण्याआधी वाफेवर शिजवून घेणे. 

६. डाळ बनवण्याआधी काही काळ भिजत ठेवणे, डाळ भिजल्यानंतर ती ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घेणे. प्रत्येकवेळी डाळ धुताना पाणी बदलून घेणे. 

सुके खोबरे खवट होते, काळे पडते ? २ उपाय, खोबरे टिकेल भरपूर...
 

डाळीवर येणारा पांढरा फेस आरोग्याला कितपत हानिकारक असू शकतो ?

जर हे प्रमाण खूप जास्त झाले, तर ते आरोग्याच्या दृष्टीने जीवघेणे ठरू शकते. पण आपण रोजच्या आहारात डाळींचा समावेश जेवढ्या प्रमाणात करतो त्यामुळे जीवावर बेतण्याची शक्यता नाही. अगदीच जास्त प्रमाणात डाळी खाल्ल्या गेल्या तर त्यामुळे पचनावर वाईट परिणाम होऊन उलट्या, जुलाब होऊ शकतात. हे परिणाम व्यक्तीनुरुप बदलतात.

Web Title: Should we worry about the foamy substance released while cooking dals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न