निरोगी आयुष्य जगण्यासाठी नियमित दूध पिणं गरजेचं आहे. दररोज दूध प्यायल्याने शरीराला कॅल्शियम, प्रथिने, नैसर्गिक फॅट्स, कॅलरीज, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी -२, पोटॅशियम आणि अनेक पोषक तत्वे मिळतात. ज्यामुळे हाडंच नसून, संपूर्ण शरीराला फायदा होतो. खेडेगाव असो किंवा अर्बन एरिया, अनेकांकडे पॅकेज्ड दूध मिळतं.
बरेच जण हेच दूध पिण्यास प्राधान्य देतात. पण पॅकेज्ड दूध उकळवून प्यावे की कच्चे? असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल. मात्र, पाश्चराइज्ड दूध उकळवून पिण्याची गरज नाही. कारण ते आधीच जीवाणू नष्ट करण्याच्या प्रक्रियेतून गेले असते. त्यामुळे न उकळवताही पॅकेज्ड दूध पिण्यायोग्य असते(Should you boil milk before drinking it?).
कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या फूड सायन्स विभागाच्या मते, 'पाश्चराइज्ड दूध कच्च्या दुधापेक्षा अधिक वेळ स्टोर करून ठेवले जाऊ शकते. कच्च्या दुधात कोली, साल्मोनेला यासह इतर हानिकारक जीवाणू असतात. या हानिकारक बॅक्टेरियामुळे आपल्याला इतर आजार घेरतात.'
यासंदर्भात, टेक्नॉलॉ़जिस्ट संजीव तोमर सांगतात, 'दुधामधून बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी दूध नेहमी उकळवून प्यावे. कच्चे दूध रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतात. मुख्य म्हणजे गर्भवती महिला आणि मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते. तर पॅकेज्ड दूध हे पाश्चराइज्ड असते. जे आपल्याला डेअरीमधून मिळते. या दुधात अनेक प्रकारचे पाश्चरायझेशन होते, ज्यामुळे अशुद्धता, बॅक्टेरिया आणि इतर जीव नष्ट होतात. त्यामुळे न उकळवताही आपण हे दूध पिऊ शकता.'
दूध उकळवून प्यावे की तसेच?
पाश्चराइज्ड दूध आधीच विविध प्रक्रियेतून शुद्ध केले जाते. वारंवार दूध उकळवल्याने त्यातील आवश्यक पोषक घटक नष्ट होतात. दुधात व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते, जे कॅल्शियम शोषण्यास मदत करतात. दूध वारंवार उकळवल्यास त्यातील जीवनसत्वाचे प्रमाण कमी होते. यामुळे कॅल्शियमचे शोषण तर कमी होतेच, शिवाय हाडे आणखी कमकुवत होतात.
कोजागरी पौर्णिमा स्पेशल : करा एक कप तांदळाची खीर! जागरणासाठी मस्त सोपा सुटसुटीत आणि स्वादिष्ट बेत
दूध उकळण्याबाबत महत्त्वाच्या टिप्स
जर आपल्याला दूध उकळवून प्यायचे असेल तर, १० मिनिटापेक्षा अधिक वेळ उकळवत ठेऊ नका. एक ग्लास दूध साधारण ४ ते ५ मिनिटापेक्षा अधिक वेळ उकळवत ठेऊ नये. दूध उकळवून झाल्यानंतर रेफ्रिजरेटरमध्ये स्टोर करण्यासाठी ठेवा. पाश्चराइज्ड दूध उकळवण्याऐवजी फक्त कोमट गरम करा.