Lokmat Sakhi >Food > एकदा तळलेलं तेल पुन्हा वापरायचं का? वापरायचं असेल तर नक्की कशात साठवायचं, कशासाठी वापरायचं?

एकदा तळलेलं तेल पुन्हा वापरायचं का? वापरायचं असेल तर नक्की कशात साठवायचं, कशासाठी वापरायचं?

How To Reuse & Properly Store Of Cooking Oil : तळलेलं तेल पुन्हा वापरावं की टाकून द्यावं, कशासाठी वापरावं या साऱ्या प्रश्नांची ही उत्तरं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2023 01:43 PM2023-02-14T13:43:14+5:302023-02-14T13:45:46+5:30

How To Reuse & Properly Store Of Cooking Oil : तळलेलं तेल पुन्हा वापरावं की टाकून द्यावं, कशासाठी वापरावं या साऱ्या प्रश्नांची ही उत्तरं

Should you re-use once fried oil? If you want to use it, what exactly should you store it in, what should you use it for? | एकदा तळलेलं तेल पुन्हा वापरायचं का? वापरायचं असेल तर नक्की कशात साठवायचं, कशासाठी वापरायचं?

एकदा तळलेलं तेल पुन्हा वापरायचं का? वापरायचं असेल तर नक्की कशात साठवायचं, कशासाठी वापरायचं?

भारतीय स्वयंपाकात तेलाला अनन्यसाधारण महत्व आहे. तळलेले पदार्थ , फोडणी, चव वाढवण्यासाठी, आहारात थेट कच्चे किंवा पदार्थाला विशिष्ट आकार आणि टेक्श्चर देण्यासाठी तेलाचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. आपण जेव्हा मोठ्या प्रमाणावर पदार्थ तळतो तेव्हा हमखास बरंच तेल बाकी उरतं आणि इतकं सगळं तेल काही आपण टाकून देऊ शकत नाही. एकदा तळण्यासाठी तेल काढलं की, ते काही एकदा वापरून संपत नाही. मग त्याचा पुन्हा पुन्हा नाही पण निदान दोनदा तरी नक्कीच वापर केला जातो.

आपण जेव्हा असे पदार्थ तळतो तेव्हा त्यांचा चुरा, त्या पदार्थाचे कण तेलात उरलेले दिसतात. त्या कणांसकट दुसऱ्या पदार्थासाठी तेच तेल पुन्हा वापरलं तर ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकतं. अशावेळी हे एकदा तळण्यासाठी वापरलेलं तेल परत कसे स्टोअर करावे, त्याचा परत वापर कसा करावा यांसारखे असंख्य प्रश्न गृहिणींपुढे असतात. यासाठी काही खास टीप्स गृहिणींसाठी(How To Reuse & Properly Store Of Cooking Oil).  

एकदा तळलेलं तेल पुन्हा वापरण्याआधी अशा पद्धतीने करा स्टोअर... 

१. एकदा तळण्यासाठी वापरलेलं तेल परत वापरण्यासाठी, तेल स्टोअर करण्याआधी तेलाला संपूर्णपणे थंड होऊ द्यावे. जर आपण तसेच गरम तेल डब्यात भरुन ठेवले तर गरम तेलातील हिट पार्टिकलमुळे डब्यात वाफ तयार होऊन डब्यावर पाण्याचे थेंब साचतील. परिणामी त्या तेलात पाण्याचा अंश राहून तेल खराब होण्याची शक्यता असते. 

२. एकदा तळण्यासाठी वापरलेले तेल परत वापरण्याआधी त्याला किमान ३ वेळा गाळणीने गाळून फिल्टर करून मगच साठविले पाहिजे. असे तेल गाळून घेतल्याने त्यातील काही उरलेलं घटक किंवा अन्नपदार्थ गाळून निघतात. तेल गाळल्याने त्यातील बारीक अन्न कण निघून गेल्याने तेल खराब होणार नाही किंवा त्याला कुबट वास येणार नाही.

 

३. तेल व्यवस्थित किमान ३ वेळा गाळून फिल्टर करून घेतल्यानंतर ते एका हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवावे.   

४. फ्राईड तेल नेहमी हवाबंद कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवावं. जर तेलाच्या रंगात आणि टेक्श्चरमध्ये हलकासा जरी बदल झाला तरी ते वापरणं टाळा. फ्राईड तेल चिकट, गडद रंग आणि वास येत असल्यास ते पुन्हा वापरू नका. कारण हे शरीरासाठी हानीकारक ठरू शकतं.

 एकदा तळलेले तेल पुन्हा कशा पद्धतीने वापरावे... 

१. एकदा तळण्यासाठी वापरलेले तेल व्यवस्थित स्टोअर करून ठेवल्यानंतर पुढील किमान ३ दिवसांच्या आत ते तेल वापरून संपवावे. ३ दिवसांपेक्षा जास्त काळ हे तेल ठेवू नये. 

२. एकदा तळण्यासाठी वापरलेलं तेल पुन्हा डिप फ्राय तळण्यासाठी वापरु नये. 

३. सुक्या भाज्या, कणिक मळताना, भाज्या सॉते करताना, शॅलो फ्राय, पॅन फ्राय करताना हे तेल वापरावे.  


४. एकदा तळण्यासाठी वापरलेलं तेल परत जर आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी वापरायचे नसल्यास दिवा लावताना त्यात हे वापरावे. जेणेकरून तुम्हाला दिव्यासाठीचे वेगळे तेल विकत घ्यावे लागणार नाही. 

 एकदा तळण्यासाठी वापरेल तेल परत वापरायचे नसल्यास काही सोप्या टीप्स लक्षात ठेवा.... 

१. तळण्यासाठी तेल घेतानाच थोडे कमी प्रमाणात घ्यावे. उगाच गरजेपेक्षा जास्त तेल कढईत आधीच ओतून घेऊ नये. 

२. जर आपल्याला खूप जास्त पदार्थ एकाच वेळी तळायचे असतील तर त्या पदार्थांचे छोटे - छोटे गट करा. आणि प्रत्येक वेळी एका गटाला पुरेल इतकेच तेल कढईत ओतून घ्या. जेणेकरून एकदम तेल ओतून मग जास्तीचे तेल परत स्टोअर करून वापरण्याची वेळच येणार नाही. 


३. पदार्थ किती तळायचे आहेत त्याचा आधी अंदाज घ्या. त्या अंदाजानुसारच कढईत तेल ओतून घ्या. 

४. कढईत तेल ओतताना थोडे कमीच तेल ओतून घ्यावे. तेल कमी पडल्यास जास्तीचे तेल ओतून घेऊ शकतो. परंतु आधीच जास्तीचे तेल ओतून घेतले तर ते एकतर वाया जाऊ शकते किंवा परत स्टोअर करून वापरावे लागते.   


५. मोहरी, राईस ब्रॅन, तीळ आणि सनफ्लॉवरसारख्या तेलांचा स्मोक पाॅइंट जास्त असतो. त्यामुळे या तेलांचा वापर तुम्ही दुसऱ्यांदा करू शकता. पण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, शक्य असल्यास तेलाचा वापर जास्तीत दोनदाच करावा. 

६. ऑलिव्ह ऑईलसारख्या लो स्मोक पॉइंट असणाऱ्या तेलाचा वापर चुकूनही दुसऱ्यांदा करू नये आणि तसंच ते जास्त गरमही करू नये.

Web Title: Should you re-use once fried oil? If you want to use it, what exactly should you store it in, what should you use it for?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.