श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात अनेक सण- उत्सव- व्रत असतात. त्यामुळे बरेच जण या महिन्यांत उपवास करतात. काही जण तर श्रावण महिन्यात एकभुक्त करतात. म्हणजेच ते महिनाभर रोज एकदाच जेवतात आणि एक वेळ फराळ करतात. त्यामुळे श्रावणात बऱ्याचदा उपवासाचे पारंपरिक पदार्थ खाणं होतात. हळूहळू तेच ते साबुदाणा वडे, खिचडी सतत खाऊन त्यांचा कंटाळा येतो (how to make sabudana paratha). म्हणूनच आता साबुदाण्याचे पराठे खाऊन पाहा (simple and easy recipe of making sabudana paratha). सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी ही खास रेसिपी शेअर केली आहे. (food and recipe for fast)
साबुदाणा पराठा करण्याची रेसिपी
साहित्य
१ वाटी साबुदाणा
अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स चेहऱ्यावर कधीच येणार नाहीत! 'हे' पांढरं पाणी प्या- चेहरा होईल स्वच्छ
२ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
बारीक चिरलेली १ हिरवी मिरची
तूप किंवा शेंगदाण्याचं तेल
चवीनुसार मीठ
कृती
सगळ्यात आधी साबुदाणा ३ ते ४ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर तो ४ ते ५ तासांसाठी भिजत घाला.
यानंतर भिजलेला साबुदाणा अर्धा मिक्सरमध्ये टाका आणि त्याची बारीक पावडर करून घ्या. आणि अर्धा साबुदाणा पराठ्यांमध्ये तसाच वापरा.
नकळतपणे पालकांकडूनच मुलांना लागू शकतात ५ चुकीच्या सवयी, बघा तुमच्याकडूनही नेमकं तेच होतंय का
आता एका भांड्यात वरील पद्धतीने आपण तयार केलेले साबुदाण्याचे पीठ, साबुदाणा, उकडून किसून घेतलेला बटाटा, चवीनुसार मीठ, हिरवी मिरची, दाण्याचा कुट असं सगळं टाका.
हे मिश्रण थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्या. यासाठी तुम्ही पाण्याऐवजी ताकाचा वापरही करू शकता. किंवा काकडी किसून त्या पाण्यातही हे पीठ मळू शकता.
आता पीठ मळून झालं की त्याचे लहान लहान गोळे करा आणि तूप लावून ते तव्यावर थापून घ्या आणि त्यानंतर त्यावर झाकण ठेवून खमंग भाजून घ्या.
दही, चटणी किंवा उपवासाच्या लोणच्यासोबत हे पराठे खूप छान लागतात.