Join us  

Shravan Somvar 2022 : श्रावणी सोमवारच्या उपवासाला ५ पदार्थ खा; गॅस, एसिडीटी होणार नाही, दिवसभर एर्नेजेटिक वाटेल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 2:12 PM

Shravan Somvar 2022 : उपवासाला चालणारे त्याचबरोबर उर्जा प्रदान करणारे कोणते पदार्थ आहेत समजून घेऊया (Vrat Recipes)

सणांचा हंगाम आता सुरू झाला आहे आणि हळूहळू श्रावण, गणपती नंतर नवरात्री असे अनेक सण येतील. अशा वेळी लोक उपवास आणि उपासनेत अधिक व्यस्त असतात. असे बरेच लोक आहेत जे दिवसभर काहीही खात नाहीत आणि काहींना उपवासात फलाहार घेणे आवडते. (Shravan Special 5 best ingredients for full day fasting or vrat)

भारतात, उपवासाला खूप मान्यता आहे आणि  जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल जे श्रावणात बरेच वार उपवास ठेतात, तर त तुम्हाला अधिक उपवासांमुळे कमजोरी देखील येऊ शकते.  (What we should eat in vrat) उपवासाच्या दिवशी आहारात अशा  काही पदार्थांचा वापर केला जाऊ शकतो ज्यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळेल. उपवासाला चालणारे त्याचबरोबर उर्जा प्रदान करणारे कोणते पदार्थ आहेत समजून घेऊया (Shravan Somvar 2022)

1) साबुदाणा

साबुदाण्यांमध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असल्याने ते ऊर्जा देतात. 100 ग्रॅम साबुदाणामध्ये सुमारे 94 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 0.2 ग्रॅम प्रथिने, 0.5 ग्रॅम ल फायबर, 10 मिलीग्राम कॅल्शियम, 1.2 मिलीग्राम लोह असते. हेच कारण आहे की एवढ्या जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट खाल्ल्यानंतर अधिक ऊर्जा मिळते आणि उपवासाला साबुदाणा खाल्ल्यास पोट अधिक भरलेले वाटते.

साबुदाण्याचे पदार्थ कसेही बनवले तरी त्यात तेलाचा वापर कमी करायचा हे ध्यानात ठेवले पाहिजे. कारण जास्त स्टार्च असल्यामुळे साबुदाणा तेल शोषून घेतो आणि  त्यामुळे पोट फुगण्याची आणि सुस्तीची समस्याही येऊ शकते.

२) शिंगाड्याचे पीठ

शिंगाड्याच्या पीठात फायबरचे प्रमाण जास्त असते जे शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते आणि त्याच वेळी ते प्रथिने आणि बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्व देखील भरपूर असते ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. एका संशोधनात असे म्हटले आहे की ज्यांच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होत जाते त्यांनी आहारात शिंगाडा घेणे चांगले आहे. हे रक्तातील ग्लुकोज, रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलसाठी फायदेशीर ठरते. 

३) राजगिरा

ज्यांना आहारात प्रथिनांची आवश्‍यकता आहे, त्यांनी राजगिऱ्याचे सेवन करावे. राजगिरा फुलांच्या प्रकारातून उगम पावला असला तरी अलीकडच्या संशोधनामुळे त्याला तृणधान्यांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. याला सुपर-ग्रेन म्हणतात ज्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि फायबर भरपूर असतात. राजगिराच्या एका कपामध्ये 46 ग्रॅम कर्बोदके आणि 5 ग्रॅम फायबर असतात. यासोबतच त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह, फोलेट आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असतात. यासोबतच हे ग्लूटेन फ्री आहे जे ऊर्जा देते पण वजन वाढू देत नाही.  बहुतेक लोक राजगिरा साखरेसोबत कोणत्या ना कोणत्या प्रकारे खातात. जास्त साखर खाणे आरोग्यासाठी चांगले नाही.

4) मखाने

फराळ म्हणून दिवसातून चार वेळा खाता येईल, अशी एखादी वस्तू हवी असेल तर मखाना सर्वोत्तम ठरेल. हा एक अतिशय हलका नाश्ता आहे आणि संशोधनानुसार ते रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास मदत करू शकते. माखाना पौष्टिकतेने भरलेला असतो तसेच त्यात कर्बोदक पदार्थ असतात जे ऊर्जा देतात. मखन्यामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि लोह भरपूर असते जे तुम्हाला ऊर्जा देऊ शकते. मखान्यासोबत शेंगदाणे खाल्ल्यानं पोट  भरलेले राहते

५) ड्राय फ्रुट्स

जर तुम्हाला माखाना हा हलका नाश्ता वाटत असेल तर ड्रायफ्रुट्स खाणे हा उत्तम पर्याय असू शकतो. ड्राय फ्रुट्सना सुपर फूड म्हटले जाते ज्यात पौष्टिक मूल्य देखील जास्त असते आणि त्याच वेळी ऊर्जा मिळते.  ड्राय फ्रुट्स जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने इत्यादींनी समृद्ध असतात, ज्यामुळे ते एक परिपूर्ण आहारात समाविष्ट होतात.

ज्या रुग्णांना दिवसभर मर्यादित प्रमाणात साखर घ्यावी लागते त्यांच्यासाठी देखील हा  चांगला पर्याय आहे. यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह भरपूर प्रमाणात असते. ड्रायफ्रुट्स खाताना काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे इत्यादी समप्रमाणात खा. उपवासाच्या वेळी तुम्हाला ऊर्जा देण्यासाठी या पाच गोष्टी खूप उपयुक्त ठरू शकतात. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.श्रावण स्पेशल