Lokmat Sakhi >Food > श्रावण स्पेशल : उपवासाची पुरणपोळी कधी खाल्ली आहे का ? मऊसूत गोड उपवास पुरणपोळीची सोपी रेसिपी...

श्रावण स्पेशल : उपवासाची पुरणपोळी कधी खाल्ली आहे का ? मऊसूत गोड उपवास पुरणपोळीची सोपी रेसिपी...

Fasting Recipe : How To Make Farali Puranpoli At Home : उपवासाला कोण पुरणपोळी खातं असं म्हणू नका, पाहा हा खास पदार्थ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2023 03:01 PM2023-08-26T15:01:02+5:302023-08-26T15:01:49+5:30

Fasting Recipe : How To Make Farali Puranpoli At Home : उपवासाला कोण पुरणपोळी खातं असं म्हणू नका, पाहा हा खास पदार्थ...

Shravan Special : How To Make Farali Puranpoli At Home. | श्रावण स्पेशल : उपवासाची पुरणपोळी कधी खाल्ली आहे का ? मऊसूत गोड उपवास पुरणपोळीची सोपी रेसिपी...

श्रावण स्पेशल : उपवासाची पुरणपोळी कधी खाल्ली आहे का ? मऊसूत गोड उपवास पुरणपोळीची सोपी रेसिपी...

श्रावण महिना (Shravan Special 2023) म्हटला की प्रत्येक घरांत सणांची रेलचेल असते. सण म्हटलं की, गोडाधोडाचे पदार्थ, उपवास हे आलेच. श्रावणात बहुतेक करून सगळ्या सणांना किंवा श्रावणी सोमवार, शनिवार उपवास धरले जातात. उपवास (Fasting Recipe) असला की आपण साबुदाण्याची खिचडी - खीर, रताळ्याचा किस, उपवासाची मिसळ, थालीपीठ, फराळी पॅटिस असे अनेक पदार्थ खातो. 

श्रावण महिन्यांत बऱ्याच घरांतील बहुतेकवेळा सगळ्यांचाच उपवास असतो. आपल्याकडे उपवास असला की प्रामुख्याने साबुदाणा, बटाटा, रताळ असे काही मोजकेच पदार्थ आवडीने खाल्ले जातात. उपवासाच्या दिवशी आपण काहीवेळा काही पदार्थ घरी बनवतो तर कधी बाहेरून विकत आणतो. उपवासाचे हे पदार्थ बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरीच बनवून खाल्ले तर ते चवीला चांगले लागतात व पुरवठ्याला येतात. यंदाच्या श्रावणातल्या उपवासाला जर आपण तेच ते तेलकट साबुदाणे वडे, खिचडी, वरीचा भात, उपवासाचे थालीपीठ खाऊन कंटाळा असाल तर, उपवासाची पुरणपोळी (Farali Puranpoli) नक्की करून पहा. उपवासाची पुरणपोळी अगदी मोजक्याच साहित्यात झटपट तयार करता येते. आपल्या नेहेमीच्या पुराणपोळीसारखा खूप मोठा घाट घालावा लागत नाही(Shravan Special : How To Make Farali Puranpoli At Home : Upvasachi Puranpoli).

साहित्य :- 

१. राजगिरा पीठ - १५० ग्रॅम 
२. पाणी - गरजेनुसार 
३. तूप - ३ ते ४ टेबलस्पून 
४. मावा - १५० ग्रॅम (किसलेला मावा)
५. वेलची पूड - १/२ टेबलस्पून 
६. बदाम व पिस्त्याचे काप - १ टेबलस्पून 
७. पिठीसाखर - ३ टेबलस्पून 

फक्त १० मिनिटांत घरीच करा हलका-जाळीदार ढोकळा, मिश्रण न फेटता, न आंबवता करा ढोकळा...

गुळाचा चहा फुटू नये म्हणून ५ टिप्स, न फाटता - न नासता चहा होईल फक्कड !!

कृती :- 

१. सर्वप्रथम, एका मोठ्या बाऊलमध्ये राजगिऱ्याचे पीठ घेऊन त्यात गरजेनुसार पाणी घालून मऊसूत पीठ मळून घ्यावे. पीठ मळून झाल्यावर ते बाजूला ठेवून द्यावे. 
२. एका बाऊलमध्ये किसलेला मावा घेऊन त्यात वेलची पूड, बदाम व पिस्त्याचे काप, पिठीसाखर घालून हे सगळे जिन्नस एकजीव करून त्याचे सारण बनवून घ्यावे. 

भजी - वडे एकदम गोल गरगरीत एकसारखे होण्यासाठी १ सोपी ट्रिक, सणावाराला करा उत्तम भजी - वडे...

रक्षाबंधन स्पेशल : पांढऱ्याशुभ्र खुटखुटीत नारळ्याच्या वड्या करण्याची परफेक्ट रेसिपी, सर्वांच्या आवडीची गोडगोड वडी !

३. आता राजगिऱ्याच्या मळून घेतलेल्या पिठाचे खोलगट आकाराचे गोळे करून त्यात हे माव्याचे सारण भरून घ्यावे. 
४. माव्याचे सारण भरुन घेतल्यानंतर ही पोळी हलक्या हाताने लाटून घ्यावी. 
५. त्यानंतर पॅनवर थोडे साजूक तूप घालून ही उपवासाची पुरणपोळी दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावी.

मंगळागौरी निमित्त पारंपरिक भाजणीचे वडे बनवण्याची सोपी कृती, वडे होतील खमंग - खुसखुशीत...

आपली उपवासाची पुरणपोळी खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम उपवासाची पुरणपोळी साजूक तूप घालून खाण्यासाठी सर्व्ह करावी.

Web Title: Shravan Special : How To Make Farali Puranpoli At Home.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.