Lokmat Sakhi >Food > श्रावण स्पेशल: कांदा- लसूण न घालता करा हॉटेलसारखी चमचमीत ग्रेव्ही- बघा एकदम सोपी रेसिपी 

श्रावण स्पेशल: कांदा- लसूण न घालता करा हॉटेलसारखी चमचमीत ग्रेव्ही- बघा एकदम सोपी रेसिपी 

Shravan Special Food: कांदा, लसूण हे पदार्थ न घालता खमंग चवीच्या चमचमीत भाज्या कशा करायच्या असा प्रश्न पडला असेल तर ही रेसिपी एकदा बघाच... (how to make restaurant style gravy without adding onion and garlic)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2024 03:19 PM2024-08-08T15:19:38+5:302024-08-08T15:20:45+5:30

Shravan Special Food: कांदा, लसूण हे पदार्थ न घालता खमंग चवीच्या चमचमीत भाज्या कशा करायच्या असा प्रश्न पडला असेल तर ही रेसिपी एकदा बघाच... (how to make restaurant style gravy without adding onion and garlic)

shravan special: how to make restaurant style gravy without adding onion and garlic, how to make spicy gravy without pyaaj and lasun | श्रावण स्पेशल: कांदा- लसूण न घालता करा हॉटेलसारखी चमचमीत ग्रेव्ही- बघा एकदम सोपी रेसिपी 

श्रावण स्पेशल: कांदा- लसूण न घालता करा हॉटेलसारखी चमचमीत ग्रेव्ही- बघा एकदम सोपी रेसिपी 

Highlightsही ग्रेव्ही तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही मसालेदार भाजीसाठी वापरू शकता. 

श्रावण महिन्यात अनेक जण कांदा, लसूण हे पदार्थ खात नाहीत. कारण या महिन्यात वातावरणच असे असते की कांदा, लसूण यासारखे वातूळ पदार्थ पचत नाहीत. आयुर्वेदानुसार तर चातुर्मासात हे पदार्थ खाऊ नयेत असं सांगितलं आहे. पण चार महिने शक्य झालं नाही तरी श्रावणात मात्र अनेक जण कांदा, लसूण खाणे कटाक्षाने टाळतात. आता कांदा, लसूण न घालता चमचमीत, खमंग भाज्या कशा कराव्या, असा प्रश्न अनेकींना पडतो. त्यासाठीच बघा ही खास रेसिपी (how to make spicy gravy without pyaaj and lasun). या रेसिपीने जी ग्रेव्ही तयार होईल ती तुम्ही कोणत्याही मसालेदार भाजीसाठी वापरू शकता. शिवाय एकदा करून ठेवली तर ही ग्रेव्ही ८ दिवसही टिकते, असं व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे. (how to make restaurant style gravi without adding onion and garlic)

 

कांदा- लसूण न घालता कशी करायची ग्रेव्ही?

साहित्य

६ ते ८ लाल रंगाचे मोठे हायब्रिड टोमॅटो

५ ते ७ वेलची

३ मोठ्या वेलची

२०० किलो सोन्याचे दागिने, आजुबाजुला ५० बॉडीगार्ड! बघा 'जोधा अकबर'च्या सेटवर कसा होता ऐश्वर्याचा थाट

३ ते ४ तेजपान

३ ते ४ इंच दालचिनी

२ टीस्पून मीरे

२ टीस्पून लवंग

२ मध्यम आकाराच्या सिमला मिरची

 

मध्यम आकाराच्या गाजराचे काप

२ ते ३ टेबलस्पून कोथिंबीर

२ ते ३ टेबलस्पून काजू

२ टेबलस्पून आलं

नागपंचमी विशेष: हातावर मेहेंदी काढायची पण वेळच नाही? बघा ५ मिनिटांत काढता येणाऱ्या सुंदर डिझाईन्स

५ ते ७ हिरव्या मिरच्या

१ टेबलस्पून लाल तिखट

१ टेबलस्पून काश्मिरी लाल तिखट

२ टेबलस्पून धनेपूड

१ चमचा हळद 

३ ते ४ टेबलस्पून तेल

चवीनुसार मीठ

 

कृती 

सगळ्यात आधी गॅसवर कुकर गरम करायला ठेवा.

टाेमॅटो, सिमला मिरचीचे उभे काप करा.

नागपंचमी: पुरणाचे दिंड कधी मऊ पडतात तर कधी वातड होतात? घ्या रेसिपी- दिंड होतील फर्स्टक्लास..

यानंतर कुकर गरम झालं की त्यामध्ये टोमॅटो आणि वरील सगळे मसाल्याचे पदार्थ टाका. थोडंसं पाणी घाला आणि सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घ्या. यानंतर कुकरचं झाकण लावून टाका.

गॅस मोठा करा आणि १ शिट्टी होऊ द्या. त्यानंतर गॅस मंद ते मध्यम आचेवर ठेवा आणि आणखी दोन शिट्ट्या होऊ द्या. त्यानंतर गॅस बंद करा. 

कुकरमधले पदार्थ थंड झाले की तेजपान वेगळं काढून घ्या आणि सगळे पदार्थ मिक्सरच्या भांड्यात टाकून अगदी बारीक वाटण करून घ्या. 

आता गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यात थोडं तेल टाका आणि जिरेपूड, मिरेपूड टाकून फोडणी करा. आता यामध्ये मिक्सरमधून बारीक केलेली ग्रेव्ही टाका आणि ८ ते १० मिनिटे झाकण ठेवून मंद आचेवर चांगली शिजवून घ्या. ही ग्रेव्ही आता तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही मसालेदार भाजीसाठी वापरू शकता. 

 

Web Title: shravan special: how to make restaurant style gravy without adding onion and garlic, how to make spicy gravy without pyaaj and lasun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.