Lokmat Sakhi >Food > जन्माष्टमी विशेष: श्रीकृष्णाच्या नैवेद्यासाठी बघा कशी करायची पंजिरी, चवदार पंजिरीची सोपी रेसिपी

जन्माष्टमी विशेष: श्रीकृष्णाच्या नैवेद्यासाठी बघा कशी करायची पंजिरी, चवदार पंजिरीची सोपी रेसिपी

Shri Krishna Janmashtami 2024: श्रीकृष्ण जयंतीनिमित्त श्रीकृष्णाला अनेक ठिकाणी पंजिरीचा नैवेद्य दाखवला जातो. बघा पंजिरी करण्याची एकदम सोपी रेसिपी...(how to make panjiri for lord shri krishna?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2024 09:08 AM2024-08-25T09:08:35+5:302024-08-25T09:10:01+5:30

Shri Krishna Janmashtami 2024: श्रीकृष्ण जयंतीनिमित्त श्रीकृष्णाला अनेक ठिकाणी पंजिरीचा नैवेद्य दाखवला जातो. बघा पंजिरी करण्याची एकदम सोपी रेसिपी...(how to make panjiri for lord shri krishna?)

shrikrishna janmashtami 2024: how to make panjiri for lord shri krishna, panjiri recipe for janmashtami bhog | जन्माष्टमी विशेष: श्रीकृष्णाच्या नैवेद्यासाठी बघा कशी करायची पंजिरी, चवदार पंजिरीची सोपी रेसिपी

जन्माष्टमी विशेष: श्रीकृष्णाच्या नैवेद्यासाठी बघा कशी करायची पंजिरी, चवदार पंजिरीची सोपी रेसिपी

Highlightsअतिशय सोपी रेसिपी पाहा आणि पारंपरिक पद्धतीने श्रीकृष्णाला पंजिरीचा नैवेद्य दाखवा..

गणपतीला जसा मोदकांचा नैवेद्य प्रिय असतो, तसेच श्रीकृष्णाला पंजिरी आवडते, असं आपल्याकडे मानलं जातं. त्यामुळे बहुतांश भागांमध्ये जन्माष्टमीच्या दिवशी (Shri Krishna Janmashtami 2024) श्रीकृष्णासाठी आवर्जून पंजिरी केली जाते आणि तिचाच या दिवशी खरा मान असतो. पंजिरी घरच्याघरी करणं अतिशय सोपं आहे. शिवाय ती करण्यासाठी खूप वेळदेखील लागत नाही (panjiri recipe for janmashtami bhog).. त्यामुळे ही एक अतिशय सोपी रेसिपी पाहा आणि पारंपरिक पद्धतीने श्रीकृष्णाला पंजिरीचा नैवेद्य दाखवा..(how to make panjiri for lord shri krishna?)

पंजिरी करण्याची रेसिपी

 

साहित्य

अर्धा कप मखाना, 

पाव कप धणे पावडर, 

अर्धा कप पिठीसाखर, 

डोकं दुखायला लागलं की लगेच गोळी घेता? २ घरगुती उपाय, काही मिनिटांत डोकेदुखी कमी

पाव कप खोबऱ्याचा किस, 

पाव कप तूप, 

अर्धा कप सुकामेव्याचे तुकडे

२ टी स्पून वेलची पूड 

 

रेसिपी

- कढई गॅसवर गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये खोबऱ्याचा किस टाकून भाजून घ्या

- यानंतर कढईत तूप टाका आणि मंद गॅसवर मखाने परतून घ्या. त्यानंतर सुकामेव्याचे तुकडेही परतून घ्या. 

तज्ज्ञ सांगतात वयाच्या पंचविशीनंतर 'या' पद्धतीने दूध प्या, शरीराला होतील जास्त फायदे

- नंतर धणे पावडर कढईमध्ये टाकून ती थोडी गरम करून घ्या आणि मग खोबऱ्याचा किस, सुकामेवा, मखाना, वेलची पूड असं सगळंच कढईत टाकून सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून एकत्र करून घ्या. साधारण एखाद्या मिनिटाने गॅस बंद करा आणि हे सगळं मिश्रण थंड झाल्यानंतरच त्यात साखर टाका. पुन्हा एकदा सगळे पदार्थ हलवून झाले की श्रीकृष्णाच्या आवडीची पंजिरी झाली तयार. 

 

Web Title: shrikrishna janmashtami 2024: how to make panjiri for lord shri krishna, panjiri recipe for janmashtami bhog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.