Lokmat Sakhi >Food > Side effects of peanuts : शेंगदाणे आवडतात म्हणून किती खाणार? दिवसभरात किती दाणे खाणे योग्य? जास्त खाल्ले तर..

Side effects of peanuts : शेंगदाणे आवडतात म्हणून किती खाणार? दिवसभरात किती दाणे खाणे योग्य? जास्त खाल्ले तर..

Side effects of peanuts : शेंगदाणे खायला छान लागत असले तरी किती, कधी आणि कसे खावेत याचे तारतम्य असायला हवे...जास्त प्रमाणात दाणे खाल्ल्यास आरोग्यावर कोणते परिणाम होतात याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 12:42 PM2022-02-10T12:42:35+5:302022-02-10T13:26:38+5:30

Side effects of peanuts : शेंगदाणे खायला छान लागत असले तरी किती, कधी आणि कसे खावेत याचे तारतम्य असायला हवे...जास्त प्रमाणात दाणे खाल्ल्यास आरोग्यावर कोणते परिणाम होतात याविषयी...

Side effects of peanuts: How much to eat because you like peanuts? How many peanuts should be eaten in a day? If you eat too much .. | Side effects of peanuts : शेंगदाणे आवडतात म्हणून किती खाणार? दिवसभरात किती दाणे खाणे योग्य? जास्त खाल्ले तर..

Side effects of peanuts : शेंगदाणे आवडतात म्हणून किती खाणार? दिवसभरात किती दाणे खाणे योग्य? जास्त खाल्ले तर..

Highlights तुम्ही वेटलॉस करत असाल तर डाएटमध्ये प्रमाणापेक्षा जास्त दाण्याचा समावेश करणे उपयोगी नाही. आधीपासून पोटाशी निगडीत काही समस्या असेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने आहारात दाण्याचा उपयोग केलेला केव्हाही चांगला. 

हिवाळ्यात शेंगदाणे खाणे ही अनेकांसाठी आवडीची गोष्ट असते. कधी बागेत गेलो तर किंवा अगदी एखाद्या गडावर, ट्रीपला गेलो तर त्याठिकाणी शेंगदाणे विकणारा असतोच आणि आपण हे खारे दाणे किंवा वाफवलेले जाणे अगदी सहज घेऊन खातो. घरातही बसल्या बसऱ्या भाजलेले किंवा खारे शेंगदाणे खायला आपल्याला आवडते. शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी चांगले असतात benefits of peanuts, यामध्ये लोह, कॅल्शियम आणि झिंक मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे आहारतज्ज्ञही अनेकदा आहारात शेंगदाण्याचा वापर करण्याचा सल्ला देतात. बदामामध्ये असणारे बहुतांश सर्व घटक शेंगदाण्यात असतात, मात्र बदाम अतिशय महाग असतात. पण आरोग्यासाठी फायदेशीर असणारे हे दाणे बजेटनुसारही खिशाला परवडणारे असतात. त्यामुळे लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण शेंगदाणे आवर्जून खाऊ शकतात. असे असले तरी ते किती खायला हवेत आणि प्रमाणापेक्षा जास्त दाणे खाल्ले Side effects of peanuts तर आरोग्याच्या कोणत्या तक्रारी उद्भवतात याविषयी....

एका दिवसात किती दाणे खावेत? 

दाण्यामध्ये प्रोटीन, फॅटस आणि फायबर जास्त प्रमाणात असते. चांगल्या फॅटसचा एक उत्तम स्रोत म्हणून दाण्याकडे पाहिले जाते. शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी दाणे खाणे फायदेशीर असते. दाण्याची चिक्की, पिनट बटर, दाण्याचा लाडू अशा वेगवेगळ्या स्वरुपात तुम्ही दाणे खाऊ शकता. मात्र दिवसभरात एक मूठ दाणे खाणे ठिक आहे. पीनट बटर खात असाल तर दोन चमच्यांहून जास्त नको. तसेच कच्चे दाणे खाण्यापेक्षा भाजलेले किंवा पाण्यात भिजवलेले, उकडलेले दाणे खाणे आरोग्यासाठी केव्हाही चांगले.

(Image : Google)
(Image : Google)

दाणे कोणत्या वेळेला खावेत? 

दिवसभरात आपण वेगवेगळे पदार्थ खात असतो. मात्र फळे, दूध, भाज्या, डाळी, धान्ये, सुकामेवा यांसारख्या गोष्टी नेमक्या कधी खायला हव्यात याच्या काही वेळा ठरलेल्या आहेत. त्याचप्रमाणे दाणे दिवसाच्या कोणत्या वेळेला खाल्लेले चांगले हेही आपल्याला माहित असायला हवे. तर संध्याकाळी म्हणजे चहाच्या वेळी तुम्ही दाणे किंवा दाण्याचा पदार्थ खाऊ शकता. 

पोटाच्या समस्या उद्भवण्याची शक्यता

दाणे तब्येतीसाठी चांगले असले तरी प्रमाणापेक्षा जास्त दाणे खाणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते. त्यामुळे बद्धकोष्ठता, अतिसार आणि पोटात गोळे येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. आपल्याला आधीपासून पोटाशी निगडीत काही समस्या असेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने आहारात दाण्याचा उपयोग केलेला केव्हाही चांगला. 

(Image : Google)
(Image : Google)

वजन वाढण्यास कारणीभूत 

बैठी जीवनशैली, जंक फूडचे सेवन, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव आणि कामाचा ताण यांमुळे आधीच वजन वाढणे ही सध्या सर्वच वयोगटातील एक मोठी समस्या झाली आहे. त्यामध्ये तुम्ही दाण्याचे जास्त प्रमाणात सेवन केले तर वजन वाढण्यास ते एक महत्त्वाचे कारण होऊ शकते. एक मूठ दाण्यामध्ये १७० कॅलरीज असतात. त्यामुळे तुम्ही वेटलॉस करत असाल तर डाएटमध्ये प्रमाणापेक्षा जास्त दाण्याचा समावेश करणे उपयोगी नाही. 
 

Web Title: Side effects of peanuts: How much to eat because you like peanuts? How many peanuts should be eaten in a day? If you eat too much ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.