Join us  

ड्रायफ्रुट्सचे काप करणं किचकट काम, खूप वेळ लागतो ? २ सोप्या ट्रिक्स, झटपट करा भरपूर पातळ काप...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2023 2:07 PM

How To Chop Dry Fruits : गोड पदार्थ तयार करण्यासाठी ड्रायफ्रुट्सचे काप लागतात, ऐनवेळी करण्यापेक्षा करुन ठेवा भरपूर काप...

सध्या आपल्याकडे सणासुदीचे दिवस सुरु आहेत. येणारा प्रत्येक सण हा आपण धामधुमीत साजरा करतोच. सणवार म्हटले की घरांत काही खास पदार्थ बनवणे आलेच. आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक एका सणानुसार काही विशेष पदार्थ बनवले जातात. प्रत्येक येणाऱ्या सणाला काही विशेष पदार्थ म्हणजे तो पदार्थ हमखास गोडाधोडाचाच असतो. आपल्याकडे गोडाधोडाचे पदार्थ म्हणजे ते अतिशय शाही पद्धतीने बनवले जातात(Easy way to Chop Dry Fruits).

कोणताही गोड पदार्थ बनवायचा की त्यात आपण दूध, तूप, साखर, गूळ यांसारख्या काही पदार्थांचा नक्कीच वापर करतो. खीर, लाडू, मिठाई, बर्फी, बासुंदी असे अनेक गोड पदार्थ तयार केले जातात. या गोड पदार्थांची चव अधिक चांगली लागावी तसेच ते दिसताना देखील सुंदर दिसावेत म्हणून आपण त्यात वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुटस (How to cut Dry Fruits Slices like a pro) घालतो. गोड पदार्थ हे ड्रायफ्रुटस (How to Slice Dry Fruits) शिवाय अपूर्णच आहेत असे म्हणावे लागेल. गोड पदार्थ तयार करताना त्यात ड्रायफ्रुटस (How to Evenly Chop Dry Nuts) घातले तर ते पदार्थ अधिकच चविष्ट आणि शाही लागतात. असे गोड पदार्थ बनवताना आपण त्यात वेगवेगळ्या ड्रायफ्रुटसचे काप घालतो. सणवार जवळ आले की आपण हे ड्रायफ्रुटसचे (How to slice dry fruits Tips & Tricks)काप एकत्रित बनवूनच ठेवतो. परंतु हे ड्रायफ्रुटसचे काप कापताना त्यात बराच वेळ जातो. याचबरोबर ड्रायफ्रुटसचे पातळ काप करण्यासाठी आपण उपकरणांचा देखील वापर करतो. काहीवेळा हे कापून ठेवलेले ड्रायफ्रुटसचे काप खराब होतात. त्यामुळे ड्रायफ्रुटसचे काप करण्याची व स्टोअर करुन ठेवण्याची योग्य पद्धत नेमकी कोणती ते समजून घेऊयात(Simple and Easy Homemade Dry Fruit Slices For Sweets Tips & Tricks).

ड्रायफ्रुटसचे काप करण्याची योग्य पद्धत नेमकी कोणती ? 

१. बरेचदा काही गोड पदार्थ करायचा म्हटलं की आपण ड्रायफ्रुटसचे काप एकाचवेळी बनवून ठेवतो. हे ड्रायफ्रुटसचे काप करण्यासाठी आपल्याला सूरी, स्लायसर, किसणी अशा वेगवेगळ्या उपकरणांचा विशेष वापर करावा लागतो. परंतु आता आपण एक सोपी ट्रिक वापरून ड्रायफ्रुटसचे काप करण्यासाठी कोणत्याही विशेष साधनांचा वापर न करता झटपट काप करु शकतो. सर्वप्रथम एका बाऊलमध्ये आपल्याला जेवढे ड्रायफ्रुटस हवेत तेवढे काढून घ्यावेत. त्यानंतर या बाऊलमध्ये पाण्याचे ४ ते ५ थेंब घालावेत. आता हे चमच्याने ढवळून घ्यावे. सगळ्या ड्रायफ्रुटसना पाणी लागून ते किंचित ओले होतील याची खात्री करावी. त्यानंतर पुढील किमान २ तासांसाठी हे झाकून ठेवून द्यावेत. २ तासानंतर आपल्या सोयीनुसार सूरी किंवा स्लायसर घेऊन ड्रायफ्रुटसचे काप करून घ्यावेत. पाण्याचे काही थेंब घातल्याने ड्रायफ्रुटस मऊ पडतात त्यामुळे त्याचे हवे तसे पातळ काप करणे सहज शक्य होते.  

वडापावच्या गाड्यावर मिळते तशी सुकी लाल चटणी घरी बनवण्यासाठी वापरा १ सिक्रेट पदार्थ, चव अशी की...    

सणावाराला भाज्या करताना करा झणझणीत ग्रेव्ही, ग्रेव्ही चमचमीत होण्यासाठी १३ सोप्या टिप्स, बेत जमेल मस्त...

२. आता हे ड्रायफ्रुटसचे पातळ करुन घेतलेले काप एका सुती कापडावर पसरवून रात्रभर फॅनखाली ठेवून वाळवून घ्यावेत. दुसऱ्या दिवशी हे काप संपूर्णपणे व्यवस्थित सुकल्यानंतर एका झिपलॉक बॅगमध्ये किंवा हवाबंद डब्यांत भरुन फ्रिजमध्ये ठेवावेत. अशाप्रकारे आपण एकाचवेळी ड्रायफ्रुटसचे काप करुन ते पुढील ३ ते ४ महिने फ्रिजमध्ये चांगले स्टोअर करुन ठेवू शकतो. 

गुलाबजामचा उरलेला पाक फेकून न देता करा झटपट होणारे गुलगुले, पाक वाया न जाता बनेल नवीन गोड पदार्थ...

भरपूर टोमॅटो विकत आणले पण लगेच खराब होतात ? १ सोपी ट्रिक- १० दिवस टोमॅटो राहतील फ्रेश...

३. यासोबतच जर आपल्याला ड्रायफ्रुटसचे लहान लहान तुकडे हवे असतील, ते कापण्याआधी १५ ते २० मिनिटे फ्रिजरमध्ये ठेवून द्यावेत. फ्रिजरमध्ये ठेवून मग ड्रायफ्रुटसचे तुकडे केल्याने ते कापणे अगदी सहज शक्य होते. अशाप्रकारे आपण या २ सोप्या टिप्स वापरुन अतिशय सहजरित्या ड्रायफ्रुटसचे तुकडे व पातळ काप व लहान तुकडे करु शकतो.

नैवेद्याचे पंचामृत उरले तर त्याला थोडासा मॉर्डन टच देऊन झटपट बनवा पंचामृत केक...

टॅग्स :अन्नकिचन टिप्स