गणपती बाप्पाचे नुकतेच मोठ्या थाटामाटात घरोघरी आगमन झाले आहे (Ganapati Festival 2024). आता बाप्पा दहा दिवस आपल्या घरी विराजमान असणार. त्यामुळे मग दररोज नैवेद्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करण्याचा बहुतांश जणांचा प्रयत्न असतो. उत्साह तर दांडगा असतो. पण कधी कधी रोजचं काम, ऑफिस यामुळे वेळ अपुरा पडतो. म्हणूनच या काही अगदी झटपट होणाऱ्या रेसिपी बघून घ्या (how to make modak within few minutes?). अवघ्या काही मिनिटांतच तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळा, चवदार आणि मुख्य म्हणजे पौष्टिक नैवेद्य तयार करू शकाल. सगळेच हा प्रसाद अगदी आवडीने खातील.(simple and easy modak recipe)
कमीत कमी वेळात होणारे पौष्टिक मोदक
१. खजूर सुकामेव्याचा मोदक
या प्रकारचा मोदक करण्यासाठी काजू, बदाम, अक्रोड, शेंगदाणे, पिस्ते असा वेगवेगळ्या प्रकारचा सुकमेवा साधारण २ कप घ्या. ८ ते १० खजूर घ्या आणि पाव वाटी तूप घ्या.
फक्त एकदाच 'हा' प्रयोग करा, दातांचा पिवळेपणा कमी होईल- मोत्यांप्रमाणे पांढरे शुभ्र चमकतील
सगळे ड्रायफ्रुट्स मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर करा. खजुरसुद्धा बिया काढून मिक्सरमधून फिरवून घ्या. आता खजूर आणि ड्रायफ्रूटची पावडर एका भांड्यात एकत्र करा. त्यात थोडे तूप टाका आणि त्याचे मोदक करा.
२. गुळ शेंगदाणे आणि तूप
शेंगदाणे मिक्सरमधून फिरवून त्याचा कूट करून घ्या. आता शेंगदाण्याच्या कुटामध्ये तूप घालून ते कालवा आणि त्याचे छान मोदक करा. याला आणखी चवदार करण्यासाठी तुम्ही जायफळ पावडर, वेलची पूडही टाकू शकता.
थेंबभर खोबरेल तेलाचा सोपा उपाय- कळकट झालेले स्विच बोर्ड होतील चकाचक, नव्यासारखे स्वच्छ
३. खोबरं, सुकामेवा आणि गुळ
खोबरे किसून घ्या. त्यानंतर खोबऱ्याचा किस, सुकामेवा आणि गूळ हे तिन्ही एकत्रित मिक्सरमधून फिरवा आणि त्याची एकजीव होणारी पावडर करून घ्या. आता या मिश्रणाचे तुमच्या पद्धतीने छान मोदक करा.