Join us  

नेहमीचा वरणभात-खिचडीचा कंटाळा आला, कुकरमध्ये झटपट करा टोमॅटो राइस, आंबट-तिखट मस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2023 1:33 PM

Simple and Quick Tomato Rice in Pressure Cooker | How to make Tomato Rice In Cooker कुकरमध्ये झटपट होणारा टोमॅटो राइस आणि पापड, पोटभर जेवणाची सोय

भात हा थाळीतील मुख्य पदार्थ आहे. रोजच्या जेवणात भात हा लागतोच. भाताशिवाय जेवण अपूर्ण आहे. जेवणात भात नसेल तर, काहींना जेवल्यासारखेही वाटत नाही. भाताचे अनेक पदार्थ केले जातात. बिर्याणी, पुलाव, फ्राईड राइस, भाताची खिचडी हे पदार्थ लोकं आवडीने खातात. काही लोकांना फक्त सिंपल राइस व त्याच्या सोबत वरण असेल तरी देखील चालते.

आपल्याला भाताच्या प्रकारामध्ये हटके काहीतरी खायचं असेल तर, टॉमेटो राइस हा पदार्थ खाऊन पाहा. आंबट - तिखट चवीचा हा पदार्थ खूप उत्कृष्ट लागतो. रोज रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर,  टॉमेटो राइस हा पदार्थ करून पाहा. टॉमेटो राइस हा पदार्थ घरच्या साहित्यात तयार होतो(Simple and Quick Tomato Rice in Pressure Cooker | How to make Tomato Rice In Cooker).

टॉमेटो राइस करण्यासाठी लागणारं साहित्य

तांदूळ

टोमॅटो

तेल

वेलची

दालचिनी

बडीशेप

लवंग

जिरे

काजू

भिजवलेली चणा डाळ

लसूण

कांदा

कच्च्या केळीचे करा खमंग तिखट काप, १० मिनिटात चविष्ट पौष्टिक खाऊ तयार!

मीठ

लाल तिखट

धणे पूड

गरम मसाला

बिर्याणी मसाला

पाणी

तूप

कोथिंबीर

कृती

सर्वप्रथम, कुकरमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा, त्यात खडा गरम मसाला, जिरं, काजू, भिजवलेली चणा डाळ, बारीक चिरलेला लसूण घालून मिश्रण चांगले मिक्स करा. मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टॉमेटो घालून सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर चवीनुसार मीठ, लाल तिखट, धणे पूड, गरम मसाला, बिर्याणी मसाला, ४ मिरच्या घालून मिश्रण मिक्स करा.

उन्हाळ्यात करा विकतसारखे ऑरेंज पॉप्सिकल, कमी साहित्यात १० मिनिटात - गारेगार पॉप्सिकल रेडी

मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यावर ५ मिनिटांसाठी झाकण ठेवा, त्यानंतर एक कप धुवून घेतलेले तांदूळ घालून संपूर्ण साहित्य एकत्र मिक्स करा. आता त्यात २ कप पाणी, बारीक चिरलेली कोथिंबीर, एक चमचा तूप घालून मिक्स करा. व त्यावर कुकरचं झाकण लावून २ शिट्टी येईपर्यंत भात शिजवून घ्या. कुकर थोडं थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण उघडा, व बाऊलमध्ये हा टॉमेटो राइस सर्व्ह करा. अशा प्रकारे आंबट तिखट चवीचा हटके टॉमेटो राइस खाण्यासाठी रेडी.  

टॅग्स :अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.