गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र वातावरण मंगलमय झालं आहे. ११ दिवसांच्या या आनंदमय उत्सवात घरात पाहुण्यांची रेलचेल सुरु असते. गणपती बाप्पाच्या दर्शनाला येताना कोणीही खाली हात येत नाही. फळं व फुलं घेऊन हमखास येतात. गणपती बाप्पाच्या दर्शनाला येताना लोकं फळांमध्ये खास केळी आणतात. केळी खाण्याचे अनेक फायदे आहेत.
पोटॅशियम, जस्त, लोह यांसारख्या खनिजांसोबतच, केळी हे ऊर्जेचा एक मजबूत स्त्रोत आहे, ज्यामध्ये अ, ब, क आणि ई जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. नियमित रोज एक केळी खाल्ल्याने पोटाच्या संबंधित आजार कमी होतात. पण गणपतीत आलेल्या केळींचं करायचे काय असा प्रश्न पडतो. आपण गणपतीत आलेल्या केळींचा पौष्टीक शिरा तयार करू शकता. नेहमीचा रव्याचा शिरा आपण खातोच, आता केळीचा शिरा करून पाहा(Simple and Tasty Recipe For Banana Sheera).
पिकलेल्या केळीचा शिरा करण्यासाठी लागणारं साहित्य
केळी
रवा
तूप
बदाम
काजू
मनुके
सुकं खोबरं
फक्त १५ मिनिटांत करा 'कटोरी खमण ढोकळा ' - नाश्त्याच्या डब्यासाठी झटपट आणि पौष्टिक पदार्थ
तूप
केसर
वेलची पूड
पाणी
साखर
कृती
सर्वप्रथम, केळीची साल काढून मॅश करून घ्या. दुसरीकडे पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यात ३ चमचे तूप घाला. तूप विरघळल्यानंतर त्यात एक कप रवा घालून मध्यम आचेवर भाजून घ्या. रव्याला सोनेरी रंग आल्यानंतर त्यात बारीक चिरलेला बदाम, काजू, मनुके, सुकं खोबरं व त्यावर एक चमचा तूप घालून सर्व साहित्य भाजून घ्या. नंतर त्यात मॅश केलेली केळी घालून एकजीव करा.
वाफवण्याचं टेन्शन सोडा, कमी वेळात करा खमंग कोथिंबीर वडी! १५ मिनिटांत झटपट वडी
दुसरीकडे एका भांड्यात २ कप पाणी घाला. त्या पाण्यात केसर आणि एक चमचा वेलची पूड घालून मिक्स करा. पाण्याला उकळी आल्यानंतर रव्याच्या मिश्रणात घालून मिक्स करा. आपण गरम पाण्याऐवजी, दुधाचा देखील वापर करू शकता. नंतर त्यावर ५ मिनिटांसाठी झाकण ठेवा. ५ मिनिटानंतर झाकण काढा, व त्यात २ ते ३ चमचे साखर घाला. साखरेऐवजी आपण गुळाचा देखील वापर करू शकता. त्यावर २ मिनिटांसाठी झाकण ठेवा. २ मिनिटानंतर झाकण काढून चमच्याने मिक्स करा. अशा प्रकारे पिकलेल्या केळींचा शिरा खाण्यासाठी रेडी. आपण हा शिरा प्रसाद म्हणून देखील देऊ शकता.