Join us  

भात करपला? खाताना जळका वासही येतो? छोट्या कांद्याची ट्रिक करून पाहा, काही मिनिटात करपट वास निघून जाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2023 4:30 PM

Simple onion trick to remove Burnt taste from cooked rice : भात करपला म्हणून फेकून देऊ नका, छोटा कांदा करेल करपलेला भात ठीक, पाहा सोपी युक्ती..

भाताशिवाय (Rice) जेवण अपूर्ण आहे. अनेकांना भाताशिवाय जमत नाही. भात खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. भात खाण्याचे अनेक फायदेही आहेत. बरेच जण भात कुकर किंवा इतर भांड्यात शिजवण्यास घालतात. पण बऱ्याचदा भात करपतो. कुकरमध्ये किंवा इतर भांड्यात भात करपला की तो तळाशी चिकटून राहतो. ज्यामुळे अन्नाची नासाडी तर होतेच, शिवाय कुकरचं किंवा इतर भांडं लवकर साफही होत नाही. यामुळे भातामधून करपलेला वास येतो.

त्यामुळे भात शिजवण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी (Cooking Tips). भात करपल्यावर काय करावे? भातामधून करपलेला वास येऊ नये म्हणून कोणत्या टिप्स उपयुक्त ठरतील? करपलेल्या भातामधून जळका वास जाऊ शकतो का? पाहूयात(Simple onion trick to remove Burnt taste from cooked rice).

करपलेल्या भातातून वास येऊ नये म्हणून उपाय

करपलेल्या भातातून वास हा येतोच. अशा वेळी कांद्याचा एक सोपा उपाय आपल्याला नक्कीच मदत करेल. यासाठी आपल्याला फक्त एका मध्यम आकाराच्या कांद्याची गरज पडेल. यासाठी मध्यम आकाराचा कांदा सालासह त्याचे चार तुकडे करा. हे चार तुकडे भातामध्ये चार कोपऱ्यात दाबून ठेवा. नंतर कुकरचे झाकण बंद करा.

गुळाचा चहा फाटतो, नासल्यासारखा होतो? पाहा गुळाचा चहा करण्याची सोपी-परफेक्ट पद्धत, साखरेपेक्षा गूळच बरा...

जर आपण भात इतर भांड्यात शिजवला असेल तर, त्यावर झाकण ठेवा. १५ मिनिटानंतर झाकण काढा, व त्यातून कांदा बाजूला काढून ठेवा. या टीपमुळे भातामधून येणारा करपलेला वास निघून जाईल.

इतर काही ट्रिक्स

- जर भात करपला असेल तर, त्यावर तूप आणि जिऱ्याचा तडका द्या. तुपामुळे भातावरील करपलेला वास निघून जाईल.

फोडणीचा भात कशाला, उरलेल्या भाताचे करा क्रिस्पी मंचुरियन, चव अशी की लोकं आवडीने खातील

- लसणाच्या वापरामुळे पदार्थाची रंगत वाढते, आपण याच्या वापराने भातामधील करपलेला वास काढू शकता. यासाठी तुपात लसणाच्या पाकळ्या घालून तडका द्या, तयार तडका भातावर पसरवा. त्यानंतर त्यावर झाकण ठेवा. ५ मिनिटानंतर झाकण काढा, अशाने त्यावरील जळका वास निघून जाईल.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स