गणपती विसर्जनाचा दिवस आता जवळ येत आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी गणपती विसर्जनानिमित्त भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. भंडाऱ्यामध्ये हमखास केला जाणारा एक पदार्थ म्हणजे शेव भाजी. आता खूप लोकांची शेव भाजी जर करायची असेल तर ती झटपट आणि अतिशय सोप्या पद्धतीने कशी करायची ते बघूया (simple recipe of making shev bhaji). ही शेवभाजीची रेसिपी तुम्हाला तुमच्या कोणत्याही गेट- टुगेदर, वाढदिवस किंवा इतर काही समारंभांमध्ये करण्यासाठीही उपयुक्त ठरेल. (how to make instant shev bhaji?)
साहित्य
२ टोमॅटो, २ कांदे
अर्धी वाटी खोबऱ्याचा किस
बडीशेप, वेलची, लवंग, जिरे, शाही जिरे, धने, मेथ्या, खसखस असं सगळं साहित्य मिळून अर्धी वाटी
म्हातारपणी पार्किंसन, अल्झायमरचा त्रास नको तर ३ सवयी आताच लावून घ्या- मेंदूचे आरोग्य जपण्यासाठी...
१ चमचा हरभरा डाळ
१ चमचा तांदूळ
चवीनुसार मीठ आणि तिखट
१ चमचा आलं- लसूण पेस्ट
गरजेपुरतं तेल
कृती
सगळ्यात आधी डाळ आणि तांदूळ धुऊन घ्या. त्यानंतर ते एका कपड्यावर टाकून पुसा आणि मग कढईमध्ये टाकून थोडे भाजून घ्या.
त्यानंतर खोबऱ्याचा किस कढईत टाकून भाजून घ्या.
यानंतर बाकीचे सगळे मसाल्याचे पदार्थ घ्या आणि ते देखील हलकेसे भाजून घ्या. भाजत असताना मसाले जळणार नाही, याची काळजी घ्या.
आता थंड झालेले मसाले, खोबरे आणि डाळ- तांदूळ मिक्सरमध्ये घालून त्याचं अगदी बारीक वाटण करून घ्या.
गॅसवर कढई तापायला ठेवा. त्यामध्ये तेल घालून फोडणी करून घ्या. यानंतर कांदा- टोमॅटोची ग्रेव्ही परतून घ्या. ग्रेव्ही परतत आली की १ चमचा आलं- लसूण पेस्ट टाका.
ही ग्रेव्ही जेव्हा एकदम घट्ट होऊन तिला तेल सुटू लागेल तेव्हा त्याच्यात आपण तयार केलेला मसाला टाका. आणि सगळं मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्या.
बेदाणे खा, पण ते खरेदी करताना 'ही' गोष्ट तपासून घ्या, नाहीतर होईल तब्येतीचं नुकसान
यानंतर या मिश्रणात आता गरम पाणी टाका. तुम्हाला हवी तेवढी भाजी पातळ किंवा घट्ट ठेवू शकता.
काही मिनिटे भाजी छान उकळून घेतली की तिच्यावर झाकण ठेवून तिला सेट होऊ द्या. त्याआधी थोडी कोथिंबीर टाका. झणझणीत चटकदार शेव भाजी तयार..
वरील प्रमाणानुसार केलेली भाजी ४ ते ५ लोकांना पुरते. लोकांच्या संख्येनुसार हे प्रमाण कमी- जास्त करू शकता.