Join us  

कुकरमध्ये डाळ शिजवताना फसफसून बाहेर येते? १ सोपी ट्रिक, डाळ शिजेल मऊ, कुकर-शेगडीही राहील स्वच्छ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2023 4:11 PM

Simple Tips and tricks for making perfect dal in pressure Cooker : डाळ बाहेर येते म्हणून आपण ती लावताना घाबरतो किंवा टाळतो.

सणावाराला किंवा एरवीही पाहुणे येणार असतील तर आपण जास्तीची डाळ शिजवतो. डाळ जास्त असेल तर बरेचदा आपण कुकरमध्ये भांडे न ठेवता थेट कुकरमध्येच ती शिजायला लावतो.वेळ वाचण्यासाठी आणि स्वयंपाक झटपट होण्यासाठी हे सोयीचे असल्याने आपण असे करतो.  पण कधी पाण्याचा अंदाज चुकल्याने किंवा कधी आणखी काही कारणाने ही डाळ जास्त शिजते आणि शिट्टीसोबत फसफसून बाहेर येते. हे सगळे बाहेर आल्यावर कुकर आणि गॅस शेगडी इतकी जास्त खराब होते की आपले काम दुप्पट वाढते. इतकेच नाही तर महागाची असलेली डाळही यामुळे मोठ्या प्रमाणात वाया जाते. शिवाय हे डाळीचे पाणी इतर पसरल्यामुळे किचन देखील खराब होते(Simple Tips and tricks for making perfect dal in pressure Cooker).

 अशावेळी नक्की काय करावे हा प्रश्न अनेक गृहिणींना पडतो.डाळीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असून आहारात डाळीचा समावेश अवश्य असायला हवा. पण डाळ बाहेर येते म्हणून आपण ती लावताना घाबरतो किंवा टाळतो. मात्र असे करणे आरोग्यासाठी चांगले नाही.  मात्र १ सोपा उपाय समजून घेतल्यास कुकरच्या शिट्टीतून अशाप्रकारे उडणारे कारंजे आपण थांबवू शकतो. त्यामुळे आपले पुढचे काम वाचते आणि स्वयंपाक झटपट होण्यास मदत होते. पाहूयात यासाठी नेमके काय करायचे...

(Image : Google)

१. डाळ आणि पाणी नेहमीच्या प्रमाणात कुकरमध्ये घालायचे. 

२. त्यामध्ये एक लहान आकाराचा स्टीलचा चमचा घालायचा आणि मग कुकर लावायचा. 

३.  नेहमीप्रमाणे ३ किंवा ४ शिट्ट्या झाल्यानंतर कुकर बंद करायचा. 

४. शिजवताना चमचा घातल्याने कुकरमधून पाणी किंवा डाळ अजिबात बाहेर येत नाही.

५. स्टीलचा चमचा कसा काय शिजवायचा असा प्रश्न अनेकांना पडू शकतो पण त्याने काहीच होत नाही. 

६. यामुळे कुकर, कुकरचे झाकण, गॅस शेगटी, टाइल्स, ओटा अजिबात खराब होणार नाही आणि डाळही नीट शिजली जाईल. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.