Lokmat Sakhi >Food > गोडाची शंकरपाळी कधी कडक होतात तर कधी तळताना फुटतात, ३ टिप्स - शंकरपाळी होतील मस्त खुसखुशीत

गोडाची शंकरपाळी कधी कडक होतात तर कधी तळताना फुटतात, ३ टिप्स - शंकरपाळी होतील मस्त खुसखुशीत

Simple Tips for making Sweet God Shankarpali in Diwali Faral : महागाचे जिन्नस वापरुन केलेला पदार्थ चुकला की महिलांचा सगळा मूडच ऑफ होतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2023 09:35 AM2023-11-02T09:35:06+5:302023-11-02T09:40:02+5:30

Simple Tips for making Sweet God Shankarpali in Diwali Faral : महागाचे जिन्नस वापरुन केलेला पदार्थ चुकला की महिलांचा सगळा मूडच ऑफ होतो

Simple Tips for making Sweet God Shankarpali in Diwali Faral : Shankarpali of sweet sometimes becomes hard and sometimes it breaks while frying, 3 tips - Shankarpali will be very crispy | गोडाची शंकरपाळी कधी कडक होतात तर कधी तळताना फुटतात, ३ टिप्स - शंकरपाळी होतील मस्त खुसखुशीत

गोडाची शंकरपाळी कधी कडक होतात तर कधी तळताना फुटतात, ३ टिप्स - शंकरपाळी होतील मस्त खुसखुशीत

पूर्वी फराळाचे पदार्थ वर्षातून एकदाच होत असल्याने त्याचे विशेष अप्रूप होते. पण आता आपण वर्षभर हे पदार्थ घरातही करतो आणि बाहेरुन विकतही आणतो. त्यामुळे त्याचे म्हणावे तितके कौतुक वाटत नाही. असे असले तरी दिवाळीचा फराळ करण्याची आणि खाण्याची मजा काही औरच असते. अभ्यंगस्नान करुन सकाळच्या नाश्त्याला फराळाचे हे सगळे पदार्थ खाणे म्हणजे खऱ्या अर्थाने माहोल असतो. नातेवाईक किंवा मित्रमंडळींसोबत हे फराळाचे पदार्थ खाताना त्याची रंगत आणखीनच वाढते. पण दिवाळी म्हटली की खरेदी, साफसफाई, घराची सजावट आणि त्यात फराळाचे पदार्थ असे सगळे करता करता घरातल्या महिलांचा पिट्ट्या पडतो आणि त्या खरंच थकून जातात. अशात एखादा पदार्थ खूपच चविष्ट होतो तर एखादा पदार्थ पार चुकतो. इतके महागाचे जिन्नस वापरुन केलेला पदार्थ चुकला की महिलांचा सगळा मूडच ऑफ होतो आणि काय करावे ते सुचत नाही. पण असे होऊ नये यासाठी काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात. गोडाची शंकरपाळी करताना आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात अशा ३ गोष्टी (Simple Tips for making Sweet God Shankarpali in Diwali Faral) ....

१. प्रमाण महत्त्वाचे

गोडाची शंकरपाळी करताना सगळ्या पदार्थांचे प्रमाण अतिशय महत्त्वाचे असते. हे प्रमाण कमी-जास्त झाले तर शंकरपाळी कडक होतात नाहीतर तेलात तळताना फुटतात. १ वाटी तूप आणि १ वाटी पिठीसाखर घेतली तर त्यात बसेल तेवढाच अंदाजाने मैदा घालावा. यामध्ये साधारण १.५ ते २ वाट्या मैदा बसतो. पण तो एकदम न घालता अंदाज घेत घेत घालायला हवा. हळूहळू हाताने पीठ मळत मळत अंदाज घेत मैदा घातल्यास शंकरपाळी खुसखुशीत होण्यास मदत होते. 

२. पीठ मळल्यानंतर 

पीठ बराच वेळ एकसारखे मळावे.  आपण कोणतेही पीठ मळल्यानंतर ते मुरावे यासाठी काही वेळ ठेवून देतो. त्याचप्रमाणे शंकरपाळ्याचे पीठही काही वेळ मुरण्यासाठी ठेवायला हवे. पण ते ठेवताना उघडे न ठेवता झाकलेले असेल याची काळजी घ्यावी. त्यावर ओलसर सुती फडके घातल्यास हे पीठ मऊ राहण्यास मदत होते. पण हा मळलेल्या पीठाचा गोळा उघडा राहीला तर तो कोरडा आणि घट्ट होतो आणि नंतर लाटायला अवघड जाते. 

(Image : Google )
(Image : Google )

३. तळताना लक्षात ठेवा

काहीवेळा आपण कामाच्या घाईत असतो त्यामुळे खूप वेगाने काम संपवण्याचा प्रयत्न करतो. अनेकदा ओट्यापाशी उभे राहून पा दुखत असतात तर कधी कंबर अवघडलेली असते. अशावेळी आपण घाईघाईत खूप शंकरपाळी एकदम कढईत घालतो आणि मोठ्या गॅसवर जोरजोरात ती हलवून तळतो. असे केल्यास शंकरपाळी नीट तळली न जाता कच्चट राहण्याची शक्यता असते नाहीतर जोरजोरात हलवल्याने फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे एकावेळी कढईच्या आणि झाऱ्याच्या आकारानुसार शंकरपाळी मध्यम आचेवर  एकसारखी तळली जातील असे पाहावे. 


 

 

Web Title: Simple Tips for making Sweet God Shankarpali in Diwali Faral : Shankarpali of sweet sometimes becomes hard and sometimes it breaks while frying, 3 tips - Shankarpali will be very crispy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.