Join us  

पावसाळ्यात कुरमुरे सादळतात? ४ टिप्स; कुरमुऱ्याचा चिवडा करा मस्त कुरकुरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2024 10:00 AM

Simple tips to store Murmura (puffed rice) : कुरमुरे सादळू नये म्हणून फॉलो करा ४ टिप्स

काही लोकांना सायंकाळची छोटी भूक लागते (Puffed rice). ही छोटी भूक भागवण्यासाठी काही जण कुरमुरे खातात. कुरमुऱ्याची भेळ, भडंग किंवा चिवडा केला जातो (Food). काही जण घरात जास्त प्रमाणात कुरमुरे आणतात, आणि त्याचा चिवडा करतात, किंवा फक्त कुरमुरे खातात. पण घरात कुरमुरे आणून ठेवल्यानंतर सादळतात. ज्यामुळे त्याची चवही बदलते.

कुरमुरे कुरकुरीत राहण्यासाठी त्यांना साठवून ठेवायचं कसे? कुरमुरे स्टोर करताना कोणत्या चुका टाळाव्या? कुरमुरे सादळू नये, शिवाय कुरकुरीत राहण्यासाठी कोणत्या गोष्टी फॉलो कराव्या? कुरमुरे कुरकुरीत राहण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? पाहूयात(Simple tips to store Murmura (puffed rice)).

हवेपासून सुरक्षित

पावसाळ्यात हवेतील आद्रतेमुळे कुरमुरे सादळतात - मऊ होतात. हवेच्या संपर्कात आल्याने ते अधिक लवकर मऊ होतात. ते ओले होण्यापासून रोखण्यासाठी, ते हवाबंद कंटेनर, पॉलिथिन किंवा झिप लॉक पॅकेटमध्ये स्टोअर करून ठेवा. ज्यामुळे कुरमुरे मऊ होणार नाही.

थंड ठिकाणी स्टोअर करा

थंड आणि कोरड्या ठिकाणी कुरमुरे स्टोर करून ठेवा. ओलसरपणा असलेल्या ठिकाणांपासून दूर ठेवा. ओलावा, दमट आणि थंड वातावरणामुळे कुरमुरे सादळतात.

उघडे ठेवू नका

कुरमुरे उघडे ठेवू नका. कारण यामुळे कुरमुऱ्याच्या पॅकेटमध्ये हवा शिरते. ज्यामुळे कुरमुऱ्याचा कुरकुरीतपणा कमी होतो.

आशा भोसले सांगतात त्यांच्या आवडीच्या सोलकढीची रेसिपी, अस्सल चव आणि करायलाही सोपी

कुरमुरे सादळल्यावर उपाय

ओव्हन

कुरमुरे सादळल्यानंतर ओव्हनमध्ये बेक करा. यामुळे ओलावा निघून जाईल आणि कुरमुरे पुन्हा कुरकुरीत होतील.

डाळ - तांदूळ भिजत न घालता डोसे करायचेत? पाहा मुरमूऱ्यांचा डोसा कसा करायचा?

वाळूचा वापर करा

कुरमुरे सादळल्यानंतर वाळूचा वापर करून कुरकुरीत करा. यासाठी एका पॅनमध्ये वाळू गरम करा. त्यात कुरमुरे पसरवा. मध्यम आचेवर ५-७ मिनिटे बेक करा, मध्येच ढवळत राहा. यामुळे कुरमुरे पुन्हा कुरकुरीत होतील.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स