Join us  

हिरव्यागार मिरच्या लवकर खराब होतात, वाळून जातात? १ सोपी ट्रिक, मिरच्या राहतील १५ दिवस ताज्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2023 1:35 PM

Simple Trick for How to store green chillies for a longer duration : मिरच्या दिर्घकाळ टिकण्यासाठी वापरुन बघा ही सोपी ट्रिक...

मिरची हा आपल्या स्वयंपाकातील महत्त्वाचा घटक. एखाद्या पदार्थाला फोडणी देण्यासाठी नाहीतर वाटणात घालण्यासाठी आपण मिरचीचा वापर करतोच. त्यामुळे आठवड्याचा भाजीपाला आणताना त्यामध्ये मसाला खरेदी करताना आलं, लसूण, कडीपत्ता, कोथिंबीर यासोबत आपण आवर्जून मिरच्या आणतोच. बाजारातून या मिरच्या आणतो तेव्हा त्या छान कडक आणि हिरव्यागार असतात. पण जसे दिवस जातात तशा या मिरच्या एकतर सुकतात नाहीतर लाल पडायला लागतात. मिरच्या दिर्घकाळ आहेत तशाच छान फ्रेश राहील्या तर फोडणीला घातल्यावर पदार्थाला त्याची छान चव लागते, नाहीतर मिरचीची चव बदलते (Simple Trick for How to store green chillies for a longer duration).

पण त्या वाळून गेल्या तर मात्र वापरायला नको वाटतात. हिरव्यागार मिरचीचा ठेचा, चटणी असं काहीही अगदी छान लागतं. आपल्याला सतत बाजारात जाऊन लहानमोठ्या गोष्टी आणणं शक्य नसतं त्यामुळे आपण एकदाच जास्तीच्या आणतो. या जास्तीच्या मिरच्या फ्रिजमध्ये ठेवल्या तरी काही वेळा वाळून गेल्यासारख्या होतात. पण एकदा आणलेल्या मिरच्या दिर्घकाळ आहेत तशाच छान फ्रेश राहाव्यात यासाठी काय करता येईल याची १ सोपी ट्रिक आज आपण पाहणार आहोत. 

(Image : Google )

मिरच्या दिर्घकाळ टिकण्यासाठी सोपा उपाय...

१. मिरच्या बाजारातून आणल्या की सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घ्या.

२. या धुतलेल्या मिरच्या एखाद्या सुती कापडावर पसरुन वाळत घाला आणि आणखी एका कापडाने त्या वरच्या बाजूने पुसून घ्या. त्यामुळे त्यातील जास्तीचे मॉईश्चर निघून जाण्यास मदत होईल.

३. यानंतर हातात ग्लोव्हज घालून मिरच्यांची देठे व्यवस्थित काढून घ्यायची. मिरची तोडली जाणार नाही याची काळजी घ्यायची, पण एखादी मिरची तुटली गेलीच तर अशा मिरच्या आवर्जून वेगळ्या ठेवायच्या.

४. त्यानंतर एक एअरटाईट डबा घेऊन त्यात पातळ सुती कापड किंवा टिश्यू पेपर घालायचा आणि त्यामध्ये या मिरच्या ठेवायच्या.

५. वरच्या बाजुने पुन्हा तसेच सुती कापड घालायचे आणि डबा बंद करुन फ्रिजमध्ये ठेवायचा. 

६. अशाप्रकारे स्टोअर केलेल्या मिरच्या साधारण १५ ते २० दिवस नक्की आहेत तशा छान हिरव्यागार राहतात.  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.