Lokmat Sakhi >Food > भाजी चुकून खूप जास्त तिखट झाली तर? भाजीचा तिखटपणा कमी करण्यासाठी करा १ सोपा उपाय चटकन

भाजी चुकून खूप जास्त तिखट झाली तर? भाजीचा तिखटपणा कमी करण्यासाठी करा १ सोपा उपाय चटकन

Simple Trick to reduce chilli in Dish : ही तिखट भाजी किंवा आमटी तशीच पडून राहू नये आणि सगळ्यांनी खावे यासाठी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2023 10:50 AM2023-10-05T10:50:31+5:302023-10-05T15:27:29+5:30

Simple Trick to reduce chilli in Dish : ही तिखट भाजी किंवा आमटी तशीच पडून राहू नये आणि सगळ्यांनी खावे यासाठी...

Simple Trick to reduce chilli in Dish : Vegetables accidentally over-spicy? 1 Simple Remedy to Reduce spicyness... | भाजी चुकून खूप जास्त तिखट झाली तर? भाजीचा तिखटपणा कमी करण्यासाठी करा १ सोपा उपाय चटकन

भाजी चुकून खूप जास्त तिखट झाली तर? भाजीचा तिखटपणा कमी करण्यासाठी करा १ सोपा उपाय चटकन

भाजी-आमटी यांना तिखट, मीठ, मसाला या गोष्टी प्रमाणात असतील तर त्या चांगल्या लागतात. पण या गोष्टी प्रमाणापेक्षा कमी किंवा जास्त झाल्या तर मात्र त्या पदार्थांची चव बिघडून जाते. एकदा केलेला पदार्थ तोंडात घातल्यावर समाधान वाटले तर पाककलेत पारंगत असल्याचे म्हटले जाते. पण पदार्थ झाल्यानंतर त्यात बदल करावा लागला तर मात्र त्या पदार्थाला मजा येत नाही. तिखट किंवा मीठ कमी पडले तर आपण ते वरुन घालून शकतो. पण ते जास्त झाले तर काय करायचे हे आपल्याला अनेकदा समजत नाही. एखाद्या पदार्थात तिखट चुकून जास्त पडले तर घरातील लहान मुलं आणि ज्येष्ठ मंडळी हा पदार्थ अजिबात खाऊ शकत नाहीत (Simple Trick to reduce chilli in Dish). 

काही जणांना तर तिखट अजिबात सहन होत नाही, तोंडाची आग होते आणि छातीतही जळजळ होण्याची शक्यता असते. ज्यांना उष्णतेचा, मूळव्याधीचा किंवा अल्सरचा त्रास असतो अशांनी तर असे तिखट खाणे अतिशय घातक असते. पण चुकून तिखट जास्त झाल्यावर ती भाजी टाकून देणे शक्य नसते. अशावेळी ही तिखट भाजी किंवा आमटी तशीच पडून राहू नये आणि सगळ्यांनी खावी यासाठी नेमके काय करता येऊ शकते ते पाहूया. जास्तीचे तिखट कमी करण्यासाठी प्रसिद्ध शेफ पंकज भदौरीया आपल्याला १ सोपी ट्रिक सांगतात. यामुळे भाजीचा तिखटपणा कमी होण्यास निश्चितच मदत होईल. पाहूया ही ट्रिक कोणती आणि ती कशी करायची...

पदार्थाचा तिखटपणा कमी करण्यासाठी...

१. भाजी, आमटी किंवा ग्रेव्हीची कोणत्याही गोष्टीचा तिखटपणा कमी करण्यासाठी आपल्याला डेअरी प्रॉडक्टची म्हणजेच दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थाची आवश्यकता असते. 

२. यासाठी ग्रेव्हीच्या भाजीमध्ये आपण क्रिम किंवा दही घालू शकतो. त्यामुळे तिखटपणा कमी होण्यास निश्चितच मदत होते. 

३. पण आपली भाजी कोरडी असेल तर त्यामध्ये तूप घातल्यास तिखटपणा कमी होण्यास मदत होते. मिरची किंवा तिखटाचा झणका यामुळे आटोक्यात येतो आणि भाजी आपण किमान खाऊ शकतो. 

Web Title: Simple Trick to reduce chilli in Dish : Vegetables accidentally over-spicy? 1 Simple Remedy to Reduce spicyness...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.