नारळ प्रत्येकाच्यात घरी वापरला जातो. (Cooking Hacks) पुलाव, वरण, भाजी या सगळ्यात ओल्या नारळाचा वापर केला जातो. काहीजण चटणी तर काहीजण लाडूमध्ये ओल्या नारळाचा वापर करतात. नारळाचे पदार्थ खायला जितके चांगले वाटतात तितकं नारळ फोडण्याचे काम किचकट वाटते. (How to Open a Coconut Two Simple Methods)
नारळ फुटता फुटत नाही, तर कधी नारळ फोडताना हाताला लागतं. शेफ कुणाल कपूर यांनी नारळ फोडण्याची एक सोपी ट्रिक सांगितली आहे. ज्याचा वापर करून सहज नारळ फोडता येईल. नारळ फोडण्याचा व्हिडिओ कुणाल कपूर यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. (How To Open A Coconut)
नारळ फोडण्याच्या सोप्या स्टेप्स कोणत्या (How to Open Coconut Shell)
१) नारळ फोडण्यासाठी सगळ्यात नारळाच्या शेंड्या काढून घ्या. आधी गरम पाण्यात काहीवेळ घालून ठेवा किंवा तुम्ही मायक्रोव्हेव्हमध्येही ठेवू शकता. मायक्रोव्हेव्ह मधून बाहेर काढल्यानंतर नारळ फोडणं सहज सोपं होईल.
२) शेफ कुणाल कपूर यांच्यामते नारळाच्या रेषेवर कोणतीही जड वस्तू मारल्यानंतर ते लगेच तुटेल. २ ते ३ वेळा मारल्यानंतर नारळ लगेच तुटून हातात येईल.
३) नारळ तोडल्यानंतर लगेच गॅस स्टोव्हवर उच्च आचेवर ३० ते ३५ सेकंदांसाठी ठेवा. त्यानंतर यातील मॉईश्चर कमी होईल. नंतर नारळाचे साल काढून टाकणं सोपं होईल.
४) नारळाचे साल काढून टाकण्यासाठी रात्रभर फ्रिजरमध्ये ठेवा. जेव्हा नारळ जाडसर होईल तेव्हा त्यावर हतोडीने मारा. या पद्धतीने नारळ सहज फुटेल.
सकाळी वॉक करता तरी पोट कमी होईना? वेट लॉससाठी वॉक करताना खाऊन जायचं की नाही-तज्ज्ञ सांगतात...
५) नारळ सोलण्यासाठी तुम्ही ही सोपी ट्रिक वापरू शकता. त्यासाठी नारळ गॅसवर गरम करायला ठेवा जवळपास २ मिनिटं शेकून घ्या. त्यानंतर नारळ गॅसवर ठेवून जवळपास २ मिनिटं शेकल्यानंतर त्यात छिद्र पाडून पाणी बाहेर काढून घ्या.
१ वाटी बेसनाचा करा मऊ-जाळीदार ढोकळा: न दळता, डाळ न भिजवता पटकन करा विकतसारखा ढोकळा
पाणी बाहेर काढण्यासाठी सुरीचा वापर करू शकता. फोडलेलं नारळ तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता. नारळ खराब होऊ नये यासाठी स्वच्छ धुवून पॉलिथीन बॅगमध्ये ठेवा. फोडलेलं नारळ एका आठवड्याच्या आत वापरा अन्यथा ते खराब होऊ शकते किंवा दुर्गंध येऊ शकतो.