स्वयंपाक ओलं नारळ वापरल्याशिवाय पूर्णच होत नाही असे बरेचजण असतात. नारळ फोडणं, खोवणं कितीही किचकट काम असलं तरी अनेकींना नारळाशिवाय भाज्या किंवा इतर पदार्थ बनवणं जमत नाही. नारळ फोडण्यात आणि किसण्यात बराचवेळ जातो. (How to Open a Coconut 3 Simple Methods)
यामुळे बाकीची काम रखडतात इतकंच नाही तर तासनतास हेच काम करून हात दुखायला लागतात. नारळ फोडण्याच्या सोप्या पद्धती समजून घेतल्यास स्वयंपाकाचा वेळ वाचेल आणि तुमचं काम अधिक सोपं होईल. नारळ फोडण्याच्या सोप्या ट्रिक्स पाहूया. (Simple ways to break coconut in 2 minutes)
नारळ फोडण्याचे सोपे हॅक्स
नारळ बाजारातून आणल्यानंतर गरम पाण्यात ५ मिनिटं भिजवून ठेवा. ५ मिनिटांनी नारळाला हातानं रगडून माती साफ करा. सर्व माती स्वच्छ झाल्यानंतर नारळ स्वच्छ पाण्यानं धुवून सुकवायला ठेवा. नारळ फोडण्यासाठी तुम्ही ओव्हनचा वापर करू शकता. यासाठी सगळ्यात आधी वर सांगितले स्टेप्स पूर्ण करा.
नारळाला ओव्हनमध्ये ४० डिग्रीवर प्री हिट करून घ्या. (Easiest hack to remove coconut shell that actually works)
त्यानंतर नारळ ओव्हनमध्ये ठेवून जवळपास १ मिनिट शिजू द्या. नंतर ओव्हन बंद करून नारळाची सालं हळूहळू काढून घ्या. नारळ जर तुम्ही रात्रभर फ्रीजमध्ये ठेवला असेल तर त्यावर सकाळी हळूवार हतोडी किंवा मुसळ मारा. तुम्हाला दिसेल की नारळ सोप्या पद्धतीनं फुटलं आहे.
गॅसवर नारळ ठेवा
नारळ सोलण्यासाठी किंवा फोडण्यासाठी तुम्ही ही टिप फॉलो करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त नारळ गॅसवर ठेवून साधारण २ मिनिटे भाजून घ्यायचे आहे. यानंतर चाकूच्या साहाय्याने खोबरे सोलून वर टोचल्यानंतर पाणी बाहेर काढा. पाणी काढून टाकल्यावर तुम्ही नारळ वापरू शकता. याशिवाय सर्व प्रथम एक टॉवेल घ्या. आता टॉवेल बंद करा आणि हातोड्याच्या मदतीने फोडून घ्या. असे केल्याने नारळ फुटेल आणि सालंही निघतील.