अनेकदा आपण दह्याचा वापर करून कढी किंवा दही वडे करण्याच्या विचारात असतो पण ऐनवेळी घरात दही नसते. (Simple Ways to Set Curd Without Starter) नेहमी नेहमी बाहेरचं दही खाण्यापेक्षा घरच्याघरी सोप्या पद्धतीने तुम्ही दही बनवू शकता. (Dahi lavayche tips and tricks) ४ ते ५ पद्धती अशा आहेत ज्यामुळे इंस्टंट दही लावणं सोपं होईल. विरजण नसेल तर दही कसं लावायचं हा प्रश्न असतो पण विरजणासाठी दही नसेल तरीही तुम्ही सोप्य पद्धतीने दही लावू शकता. दही लावताना कोणत्या चुका टाळाव्यात याच्या सोप्या टिप्स पाहूया. (How to Make Curd at home)
1) हिरव्या मिरचीने दही लावा
सगळ्यात आधी एका भांड्यात कोमट दूध काढून घ्या. त्यात हिरवी मिरची घाला. मिरचीला देठ असणं फार महत्वाचे आहे. मिरचीचे देठ दूधात पूर्णपणे बुडेल याची खात्री करा. त्यानंतर ६ तासांसाठी एखाद्या गरम ठिकाणी ठेवा. ज्यामुळे दही परफेक्ट लागेल.
पोट कमी करायचंय-डाएट जराही जमत नाही? थंडीत सकाळी १ लाडू खा-भराभर वजन कमी होईल
2) लिंबाने दही लावा
सगळ्यात आधी कोमट दूधात २ चमचे लिंबाचा रस घाला. त्यानंतर दूध झाकून ६ ते ७ तासांसाठी एखाद्या गरम जागेवर ठेवून द्या. या प्रक्रियेने दही व्यवस्थित लागेल.
3) चांदीचा शिक्का
यासाठी तुम्हाला सेम प्रोसेस करावी लागेल. चांदीचा शिक्का किंवा अंगठी दूधात घालून ८ तासांसाठी एखाद्या गरम ठिकाणी ठेवा. या पद्धतीने घट्ट दही लागेल. दही सेट झाल्यानंतर शिक्का, अंगठी बाहेर काढून घ्या.
4) लाल मिरची
कोमट दूधात लाल मिरची बुडवून ठेवा. मिरचीचा वापर केल्यास १० ते १२ तासांनी व्यवस्थित दही लागेल. लाल मिरचीऐवजी तुम्ही साध्या हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर करू शकता.
दही लावताना या चुका करणं टाळा
१) दही लावाताना दूध कोमटच असावं. जास्त गरम किंवा जास्त थंड दूध असेल तर दही व्यवस्थित लागत नाही. दूध गरम केल्यानंतर कोमट करून ते दह्यासाठी वापरा. दही लावण्यासाठी जे भांड वापरत आहात ते स्वच्छ धुतलेलं असावं. जर भांडं खराब असेल तर दह्याची चव बदलू शकते.
कंबर, गुडघे फार दुखतात? नारळ-ड्रायफ्रुट्सचा १ लाडू खा-सोपी रेसिपी-कायम राहाल निरोगी
२) दही लावण्यासाठी तुम्ही विरजण किती प्रमाणात घालता हे फार महत्वाचे असते. १ ग्लास दूध असेल तर तुम्ही अर्धा ते एक चमचा दही घेऊन दूधात व्यवस्थित एकजीव करून घ्या. दही जास्त घातलं तरीही व्यवस्थित सेट होत नाही. दही लावण्यासाठी गायीच्या दुधाऐवजी म्हशीच्या दूधाचा वापर करा. फूल क्रिम दूध असेल तर दही छान सेट होतं.