सिंधी पदार्थ चवीला फार भन्नाट असतात. असाच एक मस्त पदार्थ म्हणजे सिंधी चेहेरा डोडा किंवा चेहेरो डोडो. पदार्थाचे नाव जरा हटके आहे. (Sindhi traditional rice flour dish 'Chehera Doda', check out the recipe)मात्र फार काही वेगळा व कठीण पदार्थ नसून तांदळाच्या पीठाचे थालीपीठ आहे, असे म्हणायला हरकत नाही. फारच सोपी रेसिपी असून चवीला अगदीच कमाल लागते. नाश्त्यासाठी अगदी मस्त पदार्थ आहे.
साहित्य(Sindhi traditional rice flour dish 'Chehera Doda', check out the recipe)
तांदळाचे पीठ, कांदा, मीठ, बटाटा, मेथी, हिरवा लसूण, हिरवी मिरची, लाल तिखट, तेल, पाणी
कृती
१. कांदा मस्त अगदी बारीक चिरुन घ्या. हिरवी मिरचीचे अगदी बारीक तुकडे करुन घ्या. जाडसर वाटून घेतली तरी चालेल. हिरवा लसूण बारीक चिरुन घ्या. हिरवा लसूण बाजारात, भाजी मंडईमध्ये आरामात मिळेल. बटाटा अगदीच बारीक चिरा. नाही तर तो शिजणार नाही. मेथीची जुडी छान धुऊन घ्या. मग बारीक चिरुन घ्या.
२. एका परातीमध्ये तांदळाचे पीठ घ्या. त्यामध्ये चिरलेला कांदा टाका. तसेच त्यामध्ये बारीक चिरलेला बटाटा टाका. हिरव्या मिरचीचे तुकडे टाका. तसेच बारीक चिरलेली मेथी टाका. त्यामध्ये चवीपुरते मीठ टाका. लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाका. सगळं छान मिक्स करा.
३. चार ते पाच चमचे गरम तेल त्यामध्ये ओता. मोहन घातले की पदार्थ छान खमंग व खुसखुशीत होतो. तेल नीट मिक्स करुन घ्या. त्यामध्ये थोडे थोडे पाणी ओता आणि मळून घ्या. पोळीच्या पीठापेक्षा जरा पातळ पीठ मळा. थालीपीठासाठी जसे पीठ मळता अगदी तसेच मळून घ्या.
४. एका पोलपाटावर प्लास्टीक घ्या. त्याला थोडे पाणी लावा. हाताला तेल लावा आणि हातावर पीठ घेऊन त्याची गोल पोळी तयार करा. जरा आकाराला जाडच ठेवा. नंतर प्लास्टिकवर ती थापा आणि थालीपीठ जसे थापता अगदी तसेच थापा . मग तव्यावर तेल लावा आणी केलेली पोळी त्यावर टाका. दोन्ही बाजूंनी मस्त परतून घ्या.
५. टोमॅटो चटणी किंवा तुमच्या आवडत्या चटणीशी लाऊन खा. फारच चविष्ट लागणारा हा पदार्थ नक्की करुन बघा.