Lokmat Sakhi >Food > हिवाळ्यात सायनसचा होतो फार त्रास ? प्या हे खास सूप, चविष्ट रेसिपी- सर्दीचा त्रास कमी

हिवाळ्यात सायनसचा होतो फार त्रास ? प्या हे खास सूप, चविष्ट रेसिपी- सर्दीचा त्रास कमी

Sinus Infection Winter Special Soup सायनसमुळे सर्दी, डोकेदुखी आणि वारंवार शिंका येणे असे त्रास होतात, त्यावर हा एक उपाय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2022 04:20 PM2022-10-31T16:20:31+5:302022-10-31T16:22:06+5:30

Sinus Infection Winter Special Soup सायनसमुळे सर्दी, डोकेदुखी आणि वारंवार शिंका येणे असे त्रास होतात, त्यावर हा एक उपाय.

Sinus problems in winter? Drink this special soup, tasty recipe will feel good | हिवाळ्यात सायनसचा होतो फार त्रास ? प्या हे खास सूप, चविष्ट रेसिपी- सर्दीचा त्रास कमी

हिवाळ्यात सायनसचा होतो फार त्रास ? प्या हे खास सूप, चविष्ट रेसिपी- सर्दीचा त्रास कमी

हिवाळ्यात अनेकांना सायनसचा त्रास होऊ लागतो. सायनसमुळे सर्दी, डोकेदुखी आणि वारंवार शिंका येणे असे विविध आजार उद्भवतात. यासह काही जणांना डोळेदुखीचा देखील त्रास होतो. सायनसची इतर देखील करणे असू शकतात. जर तुम्हाला सायनसचा त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मात्र हे गरमागरग सूप करुन पाहा. कमी होईल सायनसचा त्रास आणि डोकेदुखी.

साहित्य 

कोबी - अंदाजे दोन वाट्या बारीक चिरुन

लहान २ कांदे बारीक चिरून घेतलेले 

१ चमचा आलं बारीक चिरून घेतलेले 

४ ते ५ बारीक चिरून घेतेलेली हिरवी मिरची 

२- वेलची

२- लेंडी पिंपळी

मीठ

कृती 

सूप बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात पाणी घेऊन त्यात सर्व मसाले टाका.आता त्यात बारीक चिरून घेतलेली कोबी घालून शिजवा.  सूपला घट्टपणा येईपर्यंत मंद आचेवर शिजू द्या. सगळे मसाले एकत्र झाल्यानंतर गॅस बंद करावे. आणि प्यावे.

फायदे

कोबीपासून तयार केलेले हे सूप केवळ सायनस ठिक करण्यास मदत करत नाही तर पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी देखील प्रभावी आहे.

Web Title: Sinus problems in winter? Drink this special soup, tasty recipe will feel good

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.