खिचडी हा भारतीयांच्या रोजच्या खाण्यातला पदार्थ. मऊ, साधी फोडणीची खिचडी ऐरवी कोणाच्या चर्चेत नसते. स्वयंपाक करायला कंटाळा आला की सगळ्यात आधी पटकन होणारी खिचडी आवडते. पण जेव्हा बिल गेट्स स्वत: खिचडीला फोडणी देतात. त्यावेळी त्या पदार्थांचे महत्व अनेक पटीने वाढते. अलिकडेच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी (Union minister Smriti Irani) मायक्रोसॉफ्ट के सह-संस्थापक बिल गेट्स (Microsoft co-founder Bill Gates) यांच्यासोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे.
स्मृती इराणी नियमित आपले सोशल मीडिया प्रोफाईल अपडेट करत असतात. कधी मोटीव्हेशनल तर विनोदी पोस्ट टाकल्यानं ते नेहमीच चर्चेत असतात. मालिकेतील भूमिका असो किंवा राजकारण काहीजण स्मृती इराणींचं कायम कौतुक करतात कर काहीजण ट्रोलिंग करतात. (Smriti irani taught bill gates how to add tadka to khichdi people gave such reactions see viral video)
हा व्हिडिओ एका कार्यक्रमात शूट करण्यात आला होता ज्यात गेट्स तसेच स्मृती इराणी उपस्थित होते. क्लिप जसजशी पुढे जात होती तसतशी स्मृती इराणी या अब्जाधीशांना डिशमध्ये तडका कसा द्यायचा हे शिकवताना दिसत होते. कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
Recognising the Super Food of India and its POSHAN component..
— Smriti Z Irani (@smritiirani) March 2, 2023
When @BillGates gave tadka to Shree Ann Khichdi! pic.twitter.com/CYibFi01mi
“भारतातील सुपर फूड आणि त्यातील पौष्टिक घटक ओळखणे. बिल गेट्स यांनी खिचडीला फोडणी दिली! आतापर्यंत ४ लाखांपेक्षा अधिक वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला असून शेकडो प्रतिक्रिया या व्हिडिओवर आल्या आहेत. भारतीय संस्कृतीला ओळखल्याबद्दल अनेकांनी बिल गेट्स यांचे धन्यवाद दिले आहेत.
१ किलो बटाटे वापरून घरीच करा कुरकुरीत वेफर्स; ३ वर्ष खराब होणार नाहीत, पाहा सोपी रेसिपी
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांचीही भेट घेतली. गेट्स यांनी टाटांनी मागवलेली दोन पुस्तके सादर केली. गेट्स यांनी आनंद महिंद्रा यांचीही भेट घेतली आणि त्यांच्या ट्विटर प्रोफाइलवर अब्जाधीशांसह एक छायाचित्र शेअर केले. महिंद्रांनी सांगितले की, गेट्स हार्वर्ड विद्यापीठातील त्यांचे वर्गमित्र होते.