Lokmat Sakhi >Food > उन्हाळ्यात आजीच्या हातच्या आंबीलाची आठवण येतेच, गारेगार आणि तृप्त करणारं! पाहा ज्वारीच्या आंबीलाची पारंपरिक रेसिपी

उन्हाळ्यात आजीच्या हातच्या आंबीलाची आठवण येतेच, गारेगार आणि तृप्त करणारं! पाहा ज्वारीच्या आंबीलाची पारंपरिक रेसिपी

So Rich And Satisfying Recipe! Check Out The Traditional Jowar Ambil : ज्वारी प्रचंड पौष्टिक असते. त्यापासून तयार करा मस्त आंबील. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फायदेशीर.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2025 18:17 IST2025-03-20T16:42:00+5:302025-03-20T18:17:58+5:30

So Rich And Satisfying Recipe! Check Out The Traditional Jowar Ambil : ज्वारी प्रचंड पौष्टिक असते. त्यापासून तयार करा मस्त आंबील. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फायदेशीर.

So Rich And Satisfying Recipe! Check Out The Traditional Jowar Ambil | उन्हाळ्यात आजीच्या हातच्या आंबीलाची आठवण येतेच, गारेगार आणि तृप्त करणारं! पाहा ज्वारीच्या आंबीलाची पारंपरिक रेसिपी

उन्हाळ्यात आजीच्या हातच्या आंबीलाची आठवण येतेच, गारेगार आणि तृप्त करणारं! पाहा ज्वारीच्या आंबीलाची पारंपरिक रेसिपी

आजीच्या खाना-खजान्यामध्ये अनेक छान-छान रेसिपी असतात. मुख्य म्हणजे त्या जेवढ्या चविष्ट असतात तेवढ्याच पौष्टिकही असतात. लहानपणी हे पदार्थ आपण नित्य नियमाने खायचो. ( So Rich And Satisfying Recipe! Check Out The Traditional Jowar Ambil)आधी ते घरोघरी तयार केले जायचे. मात्र आता ते काही ठिकाणीच तयार केले जातात. पुढच्या पिढ्यांना तर ते माहितीही नसतात. अशा रेसिपींचे जतन करणे आवश्यकच. अशीच एक रेसिपी आहे जी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरोघरी तयार केलीच जायची. ती म्हणजे आंबील. ( So Rich And Satisfying Recipe! Check Out The Traditional Jowar Ambil)

आंबील बाजरीचे केले जाते. तसेच नाचणीचेही केले जाते. काही ठिकाणी ज्वारीचे आंबील फार लोकप्रिय आहे. ( So Rich And Satisfying Recipe! Check Out The Traditional Jowar Ambil)ते चवीला छान लागते आणि पौष्टिकही फार असते. ज्वारीमध्ये भरपूर प्रोटीन असतात. तसेच फायबर, जीवनसत्वे, खनिजे,  अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे ज्वारी खाणे फार उपयोगी असते.  

साहित्य
तेल, मोहरी, हिरवी मिरची, ज्वारी, पांढरे तीळ, दही, खोबर्‍याचे तुकडे, मीठ, कडीपत्ता

कृती
१. ज्वारी रात्रभर भिजत ठेवायची. ज्वारीचे पीठ वापरले तरी चालते पण मग ते सकाळीच थोड्यावेळासाठी भिजवून घेतले तरी चालते. पीठाचा वापर केला तर झटपट तयार करता येते.

२. भिजवलेली ज्वारी मिक्सरमधून वाटून घ्यायची. त्याचे पाणी करू नका. जरा घट्टच वाटा म्हणजे टेकश्चर चांगले येते.

३. एका कढईमध्ये तेल घ्या. ते जरासे गरम झाले की त्यामध्ये मोहरी घाला. मोहरी तडतडू द्या. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कडीपत्ता टाका. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे टाका. त्यामध्ये पांढरे तीळ घाला. पांढर्‍या तीळाची चव खुप छान येते.  त्यामध्ये ताज्या खोबर्‍याचे म्हणजेच ओल्या खोबर्‍याचे तुकडे टाका. 

४. त्यामध्ये आता दही ओता ते सतत ढवळत राहा. नंतर वाटून घेतलेले ज्वारीचे पीठ घ्या. चवीपुरतेच मीठ घाला. मिश्रण जरा आटेपर्यंत उकळून घ्या. 

जर तुम्हाला आंबील गरम खायचे असेल तर गरम खाऊ शकता. पण ते जरा गार करून खायला लोकांना आवडते. त्यामुळे जर तुम्हालाही गार खायचे असेल तर, थोडावेळ झाकून ठेवा गर झाले की खा. लहान मुलांना पोटभरीचे अन्न देण्यासाठी आंबील अगदीच योग्य रेसिपी आहे. पौष्टिक तर आहेच चवीलाही उत्तम असते.

Web Title: So Rich And Satisfying Recipe! Check Out The Traditional Jowar Ambil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.