Join us  

ड्रायफ्रूट्स दुधात भिजवावेत की पाण्यात? तज्ज्ञ सांगतात, सुकामेवा भिजवून खाण्याची योग्य पद्धत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2024 5:57 PM

soaking dry fruits in water or milk which is more healthy : ड्रायफ्रूट्स दुधात की पाण्यांत नेमके कशात भिजवून खाल्ल्याने त्याचा आपल्याला अधिक फायदा होतो ?

'ड्रायफ्रुट्स खाणे' हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असते. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनाच ड्रायफ्रुट्स खाणे फायदेशीर असते. साधारणपणे काजू, बदाम, बेदाणे, पिस्ता, खजूर, मनुका हे ड्रायफ्रुट्स जास्त प्रमाणात खाल्ले जातात. ड्रायफ्रुट्स खाणे भरपूर प्रमाणात पोषक असल्याने ते शरीराला ऊर्जा देतात. अनेकजणांना ड्रायफ्रुट्स भिजवून खाण्याची सवय असते. तर अनेकांना ते कोरडे खायला आवडतात. ड्रायफ्रुट्समध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात(soaking dry fruits in water or milk which is more healthy).

सकाळी उपाशी पोटी ड्रायफ्रुटस खाल्ल्याने शरीराला अनेक पोषक तत्वे मिळतात. याचबरोबर दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते. ड्रायफ्रुट्स शरीराला झटपट ऊर्जा देतात. ड्रायफ्रुट्स खाण्याने शरीर मजबूत होते. ड्रायफ्रुट्स नेहमी खाल्ल्याने शारीरिक आणि मानसिक कमजोरी दूर करण्यास मदत करतात. सकाळी उपाशीपोटी ड्रायफ्रूट्स खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असते. यासाठी काहीजण रात्री ड्रायफ्रुटस पाण्यात किंवा दुधात भिजत घालतात, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते खातात. परंतु हे ड्रायफ्रूट्स दुधात की पाण्यांत नेमके कशात भिजवून खाल्ल्याने त्याचा आपल्याला अधिक फायदा होतो हे पाहूयात. दिल्लीच्या पोषणतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ सिमरन अग्रवाल ड्रायफ्रूट्स नेमके कशात भिजवून खावे याबद्दल अधिक माहिती देतात(Soaking dry fruits in water vs soaking them in milk: Which is healthier?) 

१. ड्रायफ्रूट्स दुधात भिजवून खाण्याचे फायदे...

न्यूट्रिशनिस्ट सिमरन सांगतात की, जर तुम्हाला ड्रायफ्रुट्स अर्ध्या ते एका तासांत खायचे असेल तर ते दुधात भिजवून खाणे फायदेशीर ठरते. ड्रायफ्रूट्स दुधात भिजवल्याने दुधाला चव येते. ज्यांना दूध प्यायला त्रास होतो किंवा ज्यांना दुधाची चव आवडत नाही त्यांनी जर दुधात ड्रायफ्रुट्स मिसळून खाल्ले तर त्यांना त्याचा अधिक फायदा होतो. दुधात भिजवून ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने शरीराला प्रथिने, कॅल्शियम आणि खनिजे अधिक प्रमाणात मिळतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. एवढेच नाही तर दुधात भिजवलेले ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने वजन वाढण्यास मदत होते.

हिरव्या मिरच्या जास्त दिवस टिकाव्या, सडू नये म्हणून ‘हा’ खास उपाय- मिरच्या लवकर सडणार नाहीत...

२. ड्रायफ्रुट्स पाण्यात भिजवून खाण्याचे फायदे... 

तज्ज्ञांच्या मते, ड्रायफ्रूट्स पाण्यात भिजवल्यास त्यातील फायटिक ॲसिडचे प्रमाण कमी होते. फायटिक ऍसिड पोटासाठी हानिकारक ठरू शकते. ड्रायफ्रुट्स पाण्यात भिजवल्याने त्यातील पोषकतत्व वाढतात. पाण्यात भिजवलेले ड्रायफ्रूट्स त्याच्या वरच्या थरातील फायटिक ॲसिड नष्ट करतात. या फायटिक ऍसिडमुळे अपचन होऊ शकते. त्यामुळे पाण्यात भिजवलेले ड्रायफ्रूट्स खाणे जास्त फायदेशीर असते. 

मुलांना पालेभाज्या आवडत नाहीत, सतत नाकं मुरडतात? ६ सोप्या ट्रिक्स-मुलं आनंदानं खातील पालेभाज्या...

३. ड्रायफ्रूट्स नेमके कशात भिजवून खावेत ? 

ड्रायफ्रुट्स पाण्यात भिजवून खावेत की दुधात भिजवून खावेत, हे प्रत्येकाच्या गरजेवर अवलंबून असते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्या लोकांना मधुमेह किंवा इतर कोणताही आजार आहे त्यांना जर ड्रायफ्रूट्स नेहमी खायचे असतील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ते खावेत. 

ड्रायफ्रूट्स भिजवून खाण्याचे फायदे :- 

१. आपण अनेकदा भिजवलेले बदाम खातो. बदामाच्या सालीमध्ये टॅनिन असते जे पोषक तत्वांचे शोषण रोखते. बदाम भिजवून खाल्ल्याने त्याची साल वेगळी होते. त्यामुळे बदाम भिजवून खावेत असा सल्ला दिला जातो. 

२. मनुका शक्यतो थेट खाल्ला जातो. परंतु तुम्ही जर ते भिजवून खाल्ले तर त्यात असलेले हानिकारक प्रिझर्व्हेटिव्ह निघून जातात आणि तुमच्या आरोग्याला त्रास होत नाही. 

३. अक्रोड बदाम हे उष्ण असतात. त्यामुळे उन्हाळ्यात ते खाल्ल्याने नुकसान होऊ शकते. त्यामुळे पाण्यांत भिजवल्याने त्याची उष्णता विरघळते. 

४. काही ड्रायफ्रूट्स अनेक दिवस भिजवून ठेवल्यास त्यांना अंकुर फुटू लागतात, त्यामुळे या गोष्टींचे पोषणमूल्य वाढते.

टॅग्स :अन्न