इडली हा दक्षिण भारतीय पदार्थ जगभरातील अनेक कुटुंबाचा फेव्हरिट नाश्ता आहे. रव्याचा शीरा, उपमा तुम्ही खूपदा खाल्ला असेल (Rawa Idli Recipe). रवा डोश्याप्रमाणेच रवा इडल्याही तुम्ही नाश्याला खाऊ शकता, रवा इडल्या बनवायला जास्त वेळ लागत नाही. खायला मऊ, सॉफ्ट इडल्या फक्त नाश्त्यालाच नाही तर दुपारच्या जेवणालाही तुम्ही ग्रेव्हीसोबत खाऊ शकता. (How to Make Rawa Idli)
रवा इडलीची रेसेपी
१) कढईत तूप गरम करा. मोहरी घाला. तडतडली की त्यात चणा डाळ आणि उडीद डाळ घाला. मंद आचेवर शिजवा. थोडा वेळ तळून घ्या.
२) त्यात हिंग, हिरवी मिरची, चिरलेला कढीपत्ता, काजू घाला. चांगले मिसळा. रंग बदलेपर्यंत तळून घ्या. सतत ढवळत राहा, हळद आणि रवा घाला, चांगले मिसळा.
३) मंद आचेवर आणखी ४-५ मिनिटे शिजवून घ्या. गॅस बंद करा आणि पूर्णपणे थंड होऊ द्या. मिश्रण हवाबंद डब्यात टाका आणि फ्रीजमध्ये ठेवा. 3 ते 4 महिने चांगले राहते.
४) जर मिश्रणाचा काही भाग वापरत असाल, तर बाकीचे लगेच फ्रीजमध्ये त्याच ठिकाणी ठेवा.
५) १ कप इडली प्रिमिक्स घ्या. दही आणि पाणी घाला, चांगले मिसळा. झाकण ठेवून 15 मिनिटे बाजूला ठेवा. eno आणि थोडे पाणी घाला. त्यानंतर इडलीच्या भांड्याला तेल लावून इडल्या १० ते १५ मिनिटं शिजवून घ्या. तयार आहेत रवा इडल्या. या इंस्टंट इडली मिश्रणापासून तुम्ही आठवड्याभरात कधीही इडल्या बनवल्या बनवू शकता.