Lokmat Sakhi >Food > कोकणातल्या घरात आजीनं मायेनं केलेलं खिमट आठवतं? मऊमऊ खिमट-त्यावर तूप, उन्हाळ्यात खायलाच हवं!

कोकणातल्या घरात आजीनं मायेनं केलेलं खिमट आठवतं? मऊमऊ खिमट-त्यावर तूप, उन्हाळ्यात खायलाच हवं!

Soft khimat with ghee, a must-eat in summer : झटपट होणारा हा पौष्टिक पदार्थ उन्हाळ्याच्या दिवसांसाठी अगदीच मस्त आहे. पाहा खिमट कशी करायची.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2025 18:56 IST2025-04-15T18:52:48+5:302025-04-15T18:56:49+5:30

Soft khimat with ghee, a must-eat in summer : झटपट होणारा हा पौष्टिक पदार्थ उन्हाळ्याच्या दिवसांसाठी अगदीच मस्त आहे. पाहा खिमट कशी करायची.

Soft khimat with ghee, a must-eat in summer! | कोकणातल्या घरात आजीनं मायेनं केलेलं खिमट आठवतं? मऊमऊ खिमट-त्यावर तूप, उन्हाळ्यात खायलाच हवं!

कोकणातल्या घरात आजीनं मायेनं केलेलं खिमट आठवतं? मऊमऊ खिमट-त्यावर तूप, उन्हाळ्यात खायलाच हवं!

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त काही खायचे मन करत नाही. सतत पाणी प्यावेसे वाटते किंवा काही तरी थंडगार  प्यावेसे वाटते. ( Soft khimat with ghee, a must-eat in summer!)उन्हाळ्यामध्ये खायची इच्छा होत नसल्याने काही असे पदार्थ केले जातात जे खाताना अगदी आरामात पचतीलही आणि त्यांचा त्रासही होणार नाही. कोकणामध्ये असाच एक चविष्ट पदार्थ उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये केला जातो. तो म्हणजे खिमट. या पदार्थाला काही ठिकाणी खिमटी असेही म्हटले जाते. ( Soft khimat with ghee, a must-eat in summer!)अगदी कमी सामग्रीमध्ये करता येतो. तसेच झटपट होतो. पौष्टिकही फार असतो. 

लहान मुलांना खिमट खायला देतात. त्यांच्यासाठी ती पौष्टिकही असते तसेच चावायला लागत नाही. मऊ व पातळ असल्याने गिळली तरी मुलांना त्याचा त्रास होणार नाही. खिमट कितीही खाल्ली तरी बाधत नाही. कितीही वेळा खाल्ली तरी हरकत नाही. 

साहित्य
तांदूळ, तूप, मीठ, लसूण, पाणी, नारळ 

कृती
१. तांदूळ अगदी स्वच्छ धुऊन घ्या. दोन ते तीन वेळा पाण्यातून काढा. नंतर एका कुकरमध्ये शिजत लावा. 
 त्यासाठी तांदूळ घ्या. नेहमी भातासाठी घेता त्या पेक्षा जास्त पाणी वापरा. खिमट करण्यासाठी पातेल्यामध्येही भात लावला तरी चालेल. फक्त जरा मऊ करायचा. 

२. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्त ताजे ओले खोबरे घ्या. त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घाला. लहान मुलांना देण्यासाठी करत असला तर लसूण कमी वापरा. लसूण व नारळाचे छान वाटण करुन घ्या. त्यामध्ये पाणीही ओता. नारळ व्यवस्थित वाटला जाईल याची काळजी घ्या. वाटण छान एकजीव झाल्यावर नारळाचे दूध काढून घ्या.

३. एका पातेल्यावर पातळ फडके ठेवा. त्यावर केलेले वाटण ओता. त्यावर थोडे पाणी घाला आणि व्यवस्थित पिळून घ्या. सगळा रस नीट काढून घ्या. चोथा बाजूला करा.

४. कुकरच्या चार ते पाच शिट्या काढून घ्या. कुकर उघडल्यावर त्यामध्ये ढवळा मारा. भात छान मऊ झाला की त्यामध्ये केलेले दूध ओता. ते सतत ढवळा आणि नंतर मीठ घाला. अगदी पातळ भात झाला त्यामध्ये उकळी आली की गॅस बंद करा. 

५. परतलेला पापड खिमट आणि वर तुपाची धार. हे कॉम्बिनेशन तुम्हाला नक्कीच आवडेल.  

Web Title: Soft khimat with ghee, a must-eat in summer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.