Lokmat Sakhi >Food > पोळ्या कडक होतात? पचतही नाही? कणिक भिजवताना घाला १ लहानशी गोष्ट-पोळ्या होतील हेल्दी

पोळ्या कडक होतात? पचतही नाही? कणिक भिजवताना घाला १ लहानशी गोष्ट-पोळ्या होतील हेल्दी

Soft Rotis - How to make them at home : पोळी खाल्ल्यावर पोट डब्ब होत असेल तर, कणिक भिजवताना त्यात १ पदार्थ घालायला विसरू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2024 03:21 PM2024-04-11T15:21:48+5:302024-04-11T18:57:36+5:30

Soft Rotis - How to make them at home : पोळी खाल्ल्यावर पोट डब्ब होत असेल तर, कणिक भिजवताना त्यात १ पदार्थ घालायला विसरू नका

Soft Rotis - How to make them at home | पोळ्या कडक होतात? पचतही नाही? कणिक भिजवताना घाला १ लहानशी गोष्ट-पोळ्या होतील हेल्दी

पोळ्या कडक होतात? पचतही नाही? कणिक भिजवताना घाला १ लहानशी गोष्ट-पोळ्या होतील हेल्दी

चपाती म्हणजे आपल्या रोजच्या जेवणातील महत्वाचा भाग (Cooking Tips). पोळी गोल आणि मऊ करण्यासाठी कणिक व्यवस्थित भिजवणं गरजेचं आहे. कणिक योग्य पद्धतीने भिजवली गेली असेल तर, पोळ्या हमखास मऊ होतात आणि रात्रीपर्यंत कडक आणि चिवट होत नाहीत (Roti Making). पण जर कणिक नीट भिजली नसेल तर, पोळ्या करण्याचं गणिक बिघडतं.

पिठात पाणी जास्त झालं तर पोळी लाटताना चिकटू शकते आणि पाणी कमी झालं तर चपाती कडक आणि चिवट होते. त्यामुळे चपातीसाठी पीठ नक्की कसे मळायचे? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल? काहींना चपाती पचत नाही, त्यांनी कणकेत एक लहानशी गोष्ट मिसळावी, ज्यामुळे पोळ्या नक्कीच पचतील. शिवाय पोळ्या टम्म फुलतील(Soft Rotis - How to make them at home).

कणिक भिजवण्याची योग्य पद्धत

कणिक भिजवण्यासाठी सर्वप्रथम, परातीमध्ये पीठ चाळून घ्या. नंतर त्यात चवीनुसार मीठ घाला. जर आपल्याला आवडत नसल्यास, आपण त्यात मीठ घालणं टाळू शकता. पीठ मळताना आपण कोमट पाण्याचा वापर करू शकता. कोमट पाण्याचा वापर केल्याने पोळ्या मऊसूत होतात. थोडं थोडं पाणी कणकेत मिक्स करा, आणि कणिक छान मळून घ्या.

दीपीका ते आलिया-अभिनेत्रींसारखी फिगर हवी? आहारतज्ज्ञ सांगतात, ४ सोपे बदल- पोट कमी-दिसाल फिट

कणिक निदान १० ते १५ मिनिटांसाठी मळत राहा. जेणेकरून पोळ्या कडक होणार नाहीत. कणिक मळून झाल्यानंतर त्यावर एक चमचा तेल ओता, आणि पुन्हा मळून घ्या. २० मिनिटांसाठी कणकेवर झाकण किंवा सुती कापड ठेवा. जेणेकरून कणिक व्यवस्थित भिजेल. १५ ते २० मिनिटानंतर कणकेचे गोळे तयार करून छान चपात्या लाटून घ्या, आणि मध्यम आचेवर शेकून घ्या. अशा पद्धतीने पोळ्या केल्यास रात्रभर मऊ - सॉफ्ट राहतील.

कपभर रवा अन् दही, करा विकतसारखा मऊसूत- पांढरा ढोकळा; पाहा इन्स्टंट रेसिपी

कणकेत मिसळा ओवा

काहींना पोळ्या पचत नाही. यासाठी आपण कणिक मळताना त्यात ओवा मिक्स करू शकता. ओवा हा फायबर, फॅटी अॅसिड आणि प्रथिने यांचा उत्तम स्त्रोत आहे. यामुळे पोटाचे विकार दूर राहतात. मुख्य म्हणजे गॅस, ॲसिडिटी आणि पोट फुगण्याची समस्या उद्भवत नाही. त्यामुळे कणिक मळताना नियमित अर्धा चमचा ओवा घालायला विसरू नका.

Web Title: Soft Rotis - How to make them at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.