सकाळच्या नाश्त्याला (Breakfast) तेलकट खाण्यापेक्षा वाफवलेले पदार्थ खाल्ले तर कसलाच त्रासही होत नाही. इडली, डोसा याप्रमाणेच ढोकळासुद्धा कमी कॅलरीजयुक्त नाश्ता आहे. (Instant Dhokla Breakfast Recipe) ढोकळा करायचा तर डाळ-तांदूळ भिजवावे लागणार ही प्रोसेस अनेकांना नको वाटते. फक्त बेसनाचा वापर करून तुम्ही मऊसूत ढोकळा बनवू शकता. (How to Make Dhokla Soft And Fluffy At Home) ढोकळा करण्यासाठी तुम्हाला फार साहित्य लागणार नाही. मोजक्या पदार्थांचा वापर करून तुम्ही रेस्टॉरंटस्टाईल सॉफ्ट ढोकळा बनवू शकता. ( How to Make Khaman Dhokla At Home) सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांना डब्याला देण्यासाठी मऊसूत ढोकळा हा उत्तम पर्याय आहे.
सॉफ्ट-जाळीदार ढोकळा करण्याची सोपी रेसिपी (How to Make Soft Dhokla)
१) एका भांड्यात वाटीभर बेसनाचे पीठ, पाव चमचा हळद, चमचाभर तेल, अर्धा चमचा मीठ, २ चमचे तेल आणि १ चिमुट सोडा, १ मिरची, १ इंच आलं, ३ ते ४ चमचे लिंबाचा रस आणि अर्धा-१ कप पाणी मिसळून मिक्सरला फिरवून घ्या.
सकाळी भाजलेल्या लसणाची १ पाकळी खा; कोलेस्टेरॉल बाहेर निघेल-म्हातारपणातही निरोही राहाल
२) गरजेनुसार आणखी पाणी घालून त्याचे मिश्रण एका भांड्यात काढून घ्या. त्यानंतर झाकण ठेवून हे मिश्रण बाजूला ठेवून द्या. त्यानंतर कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवा. त्यात एक रिंग ठेवा. झाकणाची शिट्टी, गॅस्केट काढून घ्या.
३) एका भांड्यात ढोकळ्याचे पीठ काढून ते भांडं कुकरमध्ये ठेवा. १० ते १५ मिनिटांनी ढोकळा शिजल्यानंतर गॅस बंद करा. ढोकळा थंड झाल्यानंतर त्याचे चौकोनी काप करून घ्या.
४) एका फोडणीच्या पात्रात तेल गरम करायला ठेवून त्यात मोहोरी, जीरं, कढीपत्ता, तीळ, साखर आणि पाणी घालून तयार फोडणी ढोकळ्यांवर घाला. तयार आहे गरमागरम खमन ढोकळा. जर तुम्हाला बेसनाचा ढोकळा आंबट हवा असेल तर तुम्ही त्यात पाण्याऐवजी ताकाचा वापर करू शकता.
रोज फक्त १ लाडू खा; वाढलेली शुगर कंट्रोलमध्ये येईल; घरगुती 'एंटी डायबिटीक' लाडूंची खास रेसिपी
५) ढोकळा करण्यासाठी तुम्ही बेसनाऐवजी रव्याचा किंवा मुगाच्या डाळीच्या पिठाचाही वापरही ढोकळा करण्यासाठी करू शकता. ढोकळ्यात तुम्हाला इनो किंवा सोडा वापरायचा नसेल तर मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या जेणेकरून ढोकळा सोडा न घालताही व्यवस्थित फुलेल.