Join us  

सोनाक्षी सिन्हाला आवडते तशी पारंपरिक सिंधी कढी पावसाळ्यात खाऊन पाहा, सोनाक्षीच्या आईची स्पेशल रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2024 2:44 PM

Sindhi Kadhi Recipe : विकेंडला करा सिंधी कढीचा खास बेत, आंबट - गोड चवीची कढी प्या फुरके मारत...

सध्या प्रदर्शित झालेल्या 'हिरामंडी' या वेब सिरीज आणि झहीर इकबाल सोबत लग्न या दोन गोष्टींमुळे चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे सोनाक्षी सिंन्हा. सोनाक्षीला अभिनय आणि वेगवेगळ्या प्रकारचे फूड खायला फार आवडते, असं तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होत. सोनाक्षी स्निन्ह भारतीय खाद्य पदार्थांची चाहती आहे. परदेशात गेल्यावरही ती भारतीय पद्धतीने बनवलेले अन्नपदार्थच खाणे पसंत करते. बाहेरगावी गेल्यावर ती भारतीय रेस्टोरंन्टच्या शोधात असते. सोनाक्षीला सिंधी पद्धतीचे अन्नपदार्थ आणि जर ते तिच्या आईने बनवले असतील तर खायला फारच आवडतात. सिंधी कढी, मसाला भेंडी तसेच बिहारी पद्धतीने केलेला लिट्टी चोखा हे तिचे सगळ्यात जास्त आवडीचे पदार्थ आहेत(Sonakshi Sinha’s Favourite Sindhi Kadhi).

सोनाक्षी पंजाबी पद्धतीचे पारंपरिक खाद्यपदार्थ, चायनीज डिशेज, मुंबईचे स्ट्रीट फूड असे वेगवेगळ्या चवींचे पदार्थ खाणे मनापासून पसंत करते. सोनाक्षीला खाण्यासोबतच स्वयंपाक बनवण्याची देखील तितकीच आवड आहे. ती अधून - मधून वेगवेगळे पदार्थ घरी बनवून पहाते. हे कसब तिने तिच्या आई कडून शिकले असल्याचे ती सांगते. सोनाक्षीला तिच्या आईच्या हातचे सगळेच पदार्थ आवडतात परंतु त्यातही सिंधी कढी व बटाट्याचे काप हे तिचे सर्वात जास्त आवडणारे पदार्थ आहे(Sonakshi Sinha's Favourite Sindhi Kadhi Recipe).

साहित्य :- 

१. बटाटा - १ (छोटे तुकडे)२. अरबी - ३ ते ४ (छोटे तुकडे)३. गवार - १ कप ४. फ्लॉवर - १ कप ५. भेंडी - १ कप ६. मीठ - चवीनुसार ७. हळद - १ टेबलस्पून ८. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून ९. तेल - गरजेनुसार १०. मोहरी - १ टेबलस्पून ११. जिरे - १ टेबलस्पून १२. कडीपत्ता - ५ ते ६ पान १३. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ १४. बेसन - १ कप १५. पाणी - गरजेनुसार १६. टोमॅटो प्युरी - १ कप १७. चिंचेचा कोळ - १/२ कप १८.धणेपूड - १ टेबलस्पून

दुधावर साय कमी येत असली तरी तूप होईल भरपूर, सायीत मिसळा १ पदार्थ आणि पाहा जादू...

मुलांचा शाळेचा डबा पौष्टिक आणि चविष्ट करण्यासाठी १ खास टिप, खुद्द रणबीर ब्रार सांगतो..

कृती :- 

१. सगळ्यात आधी एका भांड्यात बटाटा, अरबी, गवार, फ्लॉवर, भेंडी या भाज्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करुन घ्यावेत. त्यानंतर यात हळद, मीठ, लाल मिरची पावडर घालून या सगळ्या भाज्या व्यवस्थित मॅरीनेट करून घ्याव्यात. २. एका भांड्यात तेल घेऊन त्यात जिरे, मोहरी, कडीपत्ता, हिरव्या मिरच्या घालून खमंग फोडणी तयार करून घ्यावी. या फोडणीत बेसन घालून ते खरपूस भाजून घ्यावे. बेसनाचा रंग थोडा गडद होइपर्यंत बेसन भाजून घ्यावे. आता त्यात थोडेसे पाणी घालून हे मिश्रण थोडे पातळ करुन घ्या. आता या मिश्रणात हळद, लाल मिरची पावडर, मीठ, धणे पूड घालावी.

३. ही ग्रेव्ही तयार झाल्यानंतर आता त्यात मॅरीनेट करुन ठेवलेल्या भाज्या घालाव्यात. यासोबतच थोडे पाणी घालून कढी ढवळून घ्यावी. त्यानंतर भांड्यावर  झाकण ठेवून १५ ते २० मिनिटे सगळ्या भाज्या शिजू द्याव्यात. १५ मिनिटानंतर झाकण उघडून त्यात टोमॅटो प्युरी घालावी. ४. दुसऱ्या बाजूला एका भांड्यात पाणी घेऊन त्यात चिंच घालून ते पाणी उकळवून चिंचेचा कोळ बनवून घ्यावा. हा चिंचेचा कोळ तयार झाल्यावर कढीमध्ये ओतावा. सगळ्यात शेवटी तडका बनवण्यासाठी एका छोट्या कढईमध्ये तेल घेऊन त्यात जिरे व लाल मिरची पावडर घालावी. हा तयार झालेला तडका सिंधी कढीमध्ये वरुन ओतून कढीला छान अशी खमंग फोडणी द्यावी. 

अशा प्रकारे सिंधी कढी खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम चपाती, भातासोबत आपण ही सिंधी कढी सर्व्ह करु शकता.

टॅग्स :अन्नपाककृतीसोनाक्षी सिन्हा