कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह भरभरून असणारे मखाना आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानले जातात. शिवाय वेटलाॅससाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठीही ते अतिशय गुणकारी आहेत. कारण मखान्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामुळे ते थोडे जरी खाल्ले तरी लगेचच पोटाला आराम मिळतो आणि लवकर काही खाण्याची इच्छा होत नाही (makhana chivda recipe for weight loss). कित्येक लहान मुलांना शाळेत नाश्त्याचा एक वेगळा डबा द्यावा लागतो. त्या डब्यात देण्यासाठी मसाला मखाना हा अतिशय उत्तम पदार्थ आहे (how to make chatpata makhana?). बऱ्याचदा संध्याकाळी थोडी भूक लागते. अशी छोटीशी भूक भागविण्यासाठी मसाला मखाना किंवा मखान्याचा चटपटीत चिवडा हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.(best evening snacks using makhana)
मसाला मखाना करण्याची रेसिपी
साहित्य
२ कप मखाना
२ चमचे तूप
१ टीस्पून मीठ
दुपारच्या जेवणात ५ चुका कराल तर व्यायाम करूनही वजन घटणार नाही, पोट-वजन कमी करायचं तर...
१ टीस्पून हळद
१ टीस्पून मीरेपूड
१ टीस्पून काश्मिरी लाल तिखट
१ टीस्पून चाट मसाला
१ टीस्पून आमचूर पावडर
कृती
सगळ्यात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाली की त्यात १ चमचा तूप टाका आणि मखाना टाकून चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. मखाने छान कुरकुरीत झाले की ते कढईतून बाहेर काढा.
आता कढईमध्ये २ चमचे तूप टाका. तूप गरम झालं की त्यात हळद, तिखट, मीरेपूड, चाट मसाला, आमचूर पावडर घाला आणि सगळं मिश्रण हलवून घ्या.
यानंतर त्यामध्ये भाजून घेतलेले मखाना आणि चवीनुसार मीठ टाका आणि पुन्हा एकदा सगळं मिश्रण हलवून घ्या. कढईमध्ये घातलेला मसाला सगळ्या मखान्यांना व्यवस्थित लागला की गॅस बंद बरा.
आता हे तयार झालेले तुमचे चटपटीत मसाला मखाने जोपर्यंत पुर्णपणे थंड होत नाहीत, तोपर्यंत ते कढईमध्ये तसेच उघडे ठेवा. त्यावर झाकण ठेवू नका. अन्यथा ते सादळून जातात.