Lokmat Sakhi >Food > Source of Vitamin C : लिंबू महाग म्हणून चिंता नको; 'व्हिटॅमिन सी'साठी खा 4 फळं, सी व्हिटॅमिन भरपूर

Source of Vitamin C : लिंबू महाग म्हणून चिंता नको; 'व्हिटॅमिन सी'साठी खा 4 फळं, सी व्हिटॅमिन भरपूर

Source of Vitamin C : लिंबाच्या किमती गगनाला भिडल्या असल्याने लिंबू खाणे सामान्यांच्या आवाक्यात राहिले नाही. असे असताना शरीराला असलेली व्हिटॅमिन सी ची गरज तर भागवायला हवी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2022 12:14 PM2022-05-12T12:14:43+5:302022-05-12T12:16:47+5:30

Source of Vitamin C : लिंबाच्या किमती गगनाला भिडल्या असल्याने लिंबू खाणे सामान्यांच्या आवाक्यात राहिले नाही. असे असताना शरीराला असलेली व्हिटॅमिन सी ची गरज तर भागवायला हवी.

Source of Vitamin C: Don't worry about lemons being expensive; Eat 4 fruits for Vitamin C, Plenty of Vitamin C. | Source of Vitamin C : लिंबू महाग म्हणून चिंता नको; 'व्हिटॅमिन सी'साठी खा 4 फळं, सी व्हिटॅमिन भरपूर

Source of Vitamin C : लिंबू महाग म्हणून चिंता नको; 'व्हिटॅमिन सी'साठी खा 4 फळं, सी व्हिटॅमिन भरपूर

Highlightsप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी आहारात असायलाच हवे, पाहू लिंबाशिवाय व्हिटॅमिन सीचा स्रोत असणारी फळेआरोग्याच्या विविध तक्रारींसाठी सर्व प्रकारची व्हिटॅमिन्स आहारातून जायलाच हवीत

आपल्या शरीराचे योग्य पद्धतीने पोषण व्हायचे असेल तर प्रथिने, व्हिटॅमिन, स्निग्ध पदार्थ, कार्बोदके, खनिजे, लोह असे सर्व घटक शरीराला पुरेशा प्रमाणात मिळणे आवश्यक असते. व्हिटॅमिन्समध्येही बरेच प्रकार असून विविध घटकांपासून वेगवेगळी व्हिटॅमिन्स मिळत असतात (Source of Vitamin C). लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आणि इतरही अनेक गोष्टींसाठी शरीराला  व्हिटॅमिन सी अतिशय गरजेचे असते. सर्वसाधारणपणे पुरुषांना दररोज 90 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आणि महिलांसाठी 75 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आवश्यक असते. पण ते योग्य प्रमाणात न मिळाल्यामुळे आरोग्याच्या बऱ्याच समस्या उद्भवू शकतात. 

व्हिटॅमिनी सी ची कमतरता असेल तर थकवा येणे, वजन वाढणे, सांधेदुखी, डोळे कमकुवत होणे अशा समस्या उद्भवू शकताउन्हाळ्यात तर आपण आवर्जून लिंबू सरबत पितो. इतकेच नाही तर कोशिंबीर, भाजी, पोहे, उपमा यांसारख्या पदार्थांवर आपल्याला लिंबू लागतेच. पण गेल्या काही दिवसांपासून लिंबाच्या किमती गगनाला भिडल्या असल्याने लिंबू खाणे सामान्यांच्या आवाक्यात राहिले नाही. असे असताना शरीराला असलेली व्हिटॅमिन सी ची गरज तर भागवायला हवी. तेव्हा लिंबाशिवाय कोणत्या गोष्टींमधून आपल्याला व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात मिळू शकते हे समजून घेऊया...

(Image : Google)
(Image : Google)

१. कीवी 

हे असं फळ आहे जे आपल्याला प्रत्येक ऋतुमध्ये सहजपणे मिळते. सी व्हिटॅमिन असल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासोबतच कीवी आपल्या शरीरास ब-याच प्रकारचे पोषक तत्वही देते. कीवीमधील पोषक तत्वे डिप्रेशन दूर करण्यास मदत करतात. हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी, नैसर्गिकरित्या रक्त पातळ करण्यासाठी, कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी किवी खाणे फायदेशीर ठरते. किवीमुळे थकवा दूर होतो तसेच पचनक्रिया सुधारण्यासही मदत होते. किवीमध्ये अॅंटीएजिंग गुणधर्म असल्यामुळे त्वचा निरोगी आणि मुलायम ठेवण्यासाठी देखील कीवी उपयुक्त ठरतं. 

२. संत्री 

साधारण सर्व ऋतूत मिळणारे फळ भरपूर विटामिन सी असलेल्या पदार्थांपैकी एक महत्वाचे फळ आहे. दररोज एक ग्लास संत्र्याचा रस प्यायल्याने शरीराचा तणाव व थकवा दूर होतो. संत्रीच्या दररोज सेवनाने दात आणि हिरड्या सुदृढ राहण्यासोबतच मूळव्याधही बरा होण्यास मदत होते. संत्र्यांचे दररोज सेवन केल्याने केसांची चमक वाढते आणि केस लवकर वाढतात. संत्रीमध्ये असणारे फोलेट आणि फोलिक एसिडमुळे मेंदूचा विकास होण्यास मदत होते. आंबट-गोड चवीच्या संत्र्याच्या सेवनाने पचनशक्ती वाढते तसेच उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. 

३. स्ट्रॉबेरी 

दिसायला अतिशय मोहक अशा लाल रंगाची स्ट्रॉबेरी साधारणपणे थंड हवेच्या ठिकाणी पिकते. स्ट्रॉबेरी चवीला आंबट गोड असल्याने त्यामध्ये चांगल्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. स्ट्रॉबेरी नुसती खाण्यासाठी जितकी छान लागते तितकेच स्ट्रॉबेरी विथ क्रिम, स्ट्रॉबेरीचा मिल्क शेक, स्ट्रॉबेरी जाम हे छान लागते. यामध्ये व्हिटॅमिन सी बरोबरच फायबरही असल्याने ताण कमी करण्यास स्ट्रॉबेरी फायदेशीर ठरते. तसेच त्वचा नितळ होण्यासाठीही स्ट्रॉबेरी खाणे फायदेशीर असते. 

(Image : Google)
(Image : Google)

४. पपई

पपऊई ही चवीला गोड आणि मधाळ असणारे फळ असून त्यामध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असते. रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि पचन चागंले होण्यासाठी पपई खाणे चांगले. त्वचा आणि केसांच्या विविध तक्रारीवरही पपईचा फायदा होतो. अशी ही पपई व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत असल्याने आवर्जून खायला हवी. 

Web Title: Source of Vitamin C: Don't worry about lemons being expensive; Eat 4 fruits for Vitamin C, Plenty of Vitamin C.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.