Join us  

अस्सल दाक्षिणात्य पद्धतीचे आप्पे खायचेत? कपभर रव्याचे होतील पौष्टीक आप्पे; १० मिनिटात नाश्ता रेडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2024 10:00 AM

South Indian appe Recipe; check out healthy Rava Appe Recipe : नाश्त्याला एकदा अस्सल दाक्षिणात्य पद्धतीचे पौष्टीक आप्पे करून पाहा..

सकाळच्या नाश्त्याला गरमागरम आप्पे (Appe) सोबत खोबऱ्याची चटणी असली की, पोटभर आपण नाश्ता करतो (Cooking Tips). आप्पे हा खरं तर दाक्षिणात्य पदार्थ पण त्याला आपण मराठमोळा कधी बनवला कळलंच नाही. अप्पमचे आप्पे करून त्यामध्ये अनेक विविधता आणली गेली (Food). डाळ - तांदुळाचे आप्पे आपण खातो.

पण त्यात विविध प्रकारचे भाज्या घालून, आपण त्याला ट्विस्ट आणतो. ज्यामुळे आप्पे अधिक चवीला भन्नाट लागतात. जर आपल्याला साऊथ इंडियन पद्धतीचे आप्पे खायचे असतील तर, ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पाहा. अस्सल दाक्षिणात्य पद्धतीचे आप्पे खाऊन आपलं पोट तर भरेल शिवाय पौष्टीक नाश्ता खाल्ल्याने आपल्याला दिवसभर भूकही लागणार नाही(South Indian appe Recipe; check out healthy Rava Appe Recipe).

दाक्षिणात्य पद्धतीचे आप्पे करण्यासाठी लागणारं साहित्य

रवा

दही

साडीवर फॅशनेबल ब्लाऊज शिवायचंय? बघा मागच्या गळ्याचे ९ स्टायलिश डिझाइन्स- साडी नेसून दिसाल ग्लॅमरस

बेसन

पाणी

कांदा

टोमॅटो

सिमला मिरची

गाजर

सोया चंक्स

मीठ

धणे पूड

सांबार मसाला

लाल तिखट

हळद

कोथिंबीर

तूप

कृती

सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात एक कप दही, एक कप रवा, २ चमचे बेसन आणि एक कप पाणी घालून साहित्य वाटून घ्या. तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या.

आता कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, गाजर आणि आवडत्या भाज्या चिरून घ्या. चिरलेल्या भाज्या तयार पेस्टच्या बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर मिक्सरच्या भांड्यात भिजलेले सोय चंक्स ग्राइन्ड करून घ्या. सोया चंक्सचे बारीक तुकडे त्याच पेस्टमध्ये घालून मिक्स करा. मग त्यात चवीनुसार मीठ, धणे पूड, चमचाभर सांबार मसाला, लाल तिखट, चिमुटभर हळद आणि कोथिंबीर घालून सर्व साहित्य एकजीव करा.

मस्त फुललेल्या गरम चपात्याही गार झाल्यावर वातड होतात? ४ टिप्स; शिळ्या झाल्या तरी राहतील मऊ

आता आप्पे पात्राला ब्रशने तूप लावा. त्यात चमचाभर बॅटर ओता, व मिडीयम फ्लेमवर दोन्ही बाजूने आप्पे भाजून घ्या. अशा प्रकारे दाक्षिणात्य पद्धतीचे पौष्टीक आप्पे खाण्यासाठी रेडी. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स