Join us  

सिमला मिरचीची चविष्ट चटणी खाऊन तर पाहा, रेसिपी सोपी - तोंडाला येईल चव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2023 1:03 PM

South Indian capsicum chutney for idli and dosa एका ढोबळी मिरचीची ट्राय करून पाहा चटपटीत चटणी, कमी साहित्यात हटके डिश तयार..

चटणीचे अनेक प्रकार केले जातात. भारतात चटणी फार फेमस आहे. स्नॅक्स असो किंवा जेवण, तोंडी लावण्यासाठी आपण चटणी खातोच. सुकी असो किंवा ओली घरी आपण चटणीचे प्रकार करून पाहतो. खोबऱ्याची, तिळाची, शेंगदाण्याची चटणी आपण खाल्लीच असेल, पण कधी आपण सिमला मिरचीची चटणी खाल्ली आहे का?

जर आपल्याला तिच तिच चटणी खाऊन कंटाळा आला असेल तर, सिमला मिरचीची चटपटीत चटणी करून पाहा. सिमला मिरचीचे अनेक पदार्थ केले जातात. सिमला मिरचीची भाजी, भरली ढोबळी मिरची, सिमला मिरचीचे कालवण, पण सिमला मिरचीची चटणी आपण क्वचितच खाल्ली असेल. सिमला मिरची आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. त्यामुळे जेवताना तोंडी लावण्यासाठी सिमला मिरचीची चटणी हा पदार्थ नक्की करून पाहा(South Indian capsicum chutney for idli and dosa).

सिमला मिरचीची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य

सिमला मिरची - १

टोमॅटो - ३

लसणाच्या पाकळ्या - 10 ते 12

लाल मिरची - 5 ते 6

चवीनुसार मीठ

तेल - 3 चमचे

रव्यात अळ्या झाल्या? ४ उपाय, रव्यात अळ्या होणारच नाहीत, झालेल्या जातील पळून

मोहरी - 1 टीस्पून

जिरे - 1 टीस्पून

कढीपत्ता

हिंग - 1 टीस्पून

काश्मिरी मिरची पावडर - 1 टीस्पून

कृती

सर्वप्रथम टोमॅटो आणि सिमला मिरची नीट धुवून घ्या. व त्यानंतर दोन्ही गोष्टी गॅसवर भाजून घ्या. आता टोमॅटो आणि सिमला मिरचीचा वरील सालीचा भाग काढून घ्या. व त्यांचे ४ भाग करा. मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो आणि सिमला मिरची घाला, त्यानंतर त्यात लसणाच्या पाकळ्या, लाल मिरच्या, चवीनुसार मीठ घालून पेस्ट तयार करा.

मस्त घट्ट कवडी दही लावण्यासाठी १ खास टिप, दह्याला पाणी सुटणार नाही..

पेस्ट तयार झाल्यानंतर एका बाऊलमधून काढून घ्या. आता कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा, त्यात हिंग, जिरं, मोहरी, लाल तिखट व कडीपत्ता घालून फोडणी द्या. व या फोडणीत टोमॅटो आणि सिमला मिरचीची पेस्ट घालून मिक्स करा. अशा प्रकारे सिमला मिरचीची चटपटीत चटणी खाण्यासाठी रेडी. आपण ही चटणी पुरी, चपाती किंवा भातासह खाऊ शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स