सकाळच्यावेळी नाश्त्याला (Breakfast) रोज काय नवीन पदार्थ बनवावा हे सुचत नाही अशावेळी तुम्ही घराच उपलब्ध असलेल्या साहित्यापासून चविष्ट, चवदार इडली-ढोकळा बनवू शकता. (Cooking Hacks) इडली आणि ढोकळ्याचे कॉम्बिनेशन्स करून हा पदार्थ तयार करण्यात येतो. मुलांना डब्याला देण्याासाठी किंवा नाश्त्याला खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे. (Instant Dhokla in Idli Stand)
यासाठी डाळ-तांदूळ भिजवणं, दळणं ही किचकट प्रक्रिया करावी लागते. म्हणून अनेकजण ढोकळा किंवा इडली असे पदार्थ घरी न करता विकत घेतात. हे पदार्थ घरी बनवणं पण एकदम सोपं आहे यासाठी तुम्हाला काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील. बेसनाचे पीठ सर्वाच्याच घरी असते १ वाटी बेसनाचे पीठ वापरून तुम्ही इडली ढोकळा तयार करू शकता. (Idli Dhokla Recipe in Marathi)
१) इडली ढोकळा बनवण्यासाठी सगळ्यात आधी बेसन पीठात चमचाभर हळद आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या. त्यात पाणी घालून पातळ बॅटर तयार करून घ्या.
२) त्यात इनो घालून मध्यम मिश्रण तयार करून घ्या आणि एका बाजूला ठेवून द्या. त्यानंतर इडलीच्या भांड्याला तेल लावून त्यात ढोकळ्याचे बॅटर घाला.
दिवसरात्र भात खातात तरी साऊथच्या लोकांचे पोट का सुटत नाही? भात खाण्याची योग्य पद्धत-पाहा
३) इडलीच्या कुकरमध्ये पाणी घालून त्यात हे इडलीचे साचे ठेवून १० ते १५ मिनिटांसाठी वाफवून घ्या. इडल्या वाफवून झाल्यानंतर एका ताटात काढून घ्या.
४) कढईमध्ये तेल घालून त्यात राई, जीरं, मिरची, कढीपत्ता घालून फोडणी तयार करा. तयार फोडणी इडल्यांवर घाला. इडली ढोकळा तुम्ही हिरवी चटणी किंवा सॉसबरोबर खाऊ शकता.
पचनक्रिया चांगली राहते
ढोकळा खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. यात गुड बॅक्टेरियाज मोठ्या प्रमाणात असतात. गुड बॅक्टेरियाजमुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. ढोकळ्यात फायबर्सचे प्रमाण भरपूर असते. यामुळे बाऊल मुव्हमेंट चांगली राहते आणि गॅसची समस्या उद्भवत नाही.
रोज पायी चालता तरी पोट १ इंचही कमी होईना? ५ कॉमन चुका टाळा, कमी वेळात येईल स्लिम लूक
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
ढोकळा एक लो कॅलरी फूड आहे. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी ढोकळा फायदेशीर ठरतो. ढोकळा वाफवून तयार केला जातो. यात तेलाचा वापर केला जात नाही. ढोकळा खाल्ल्याने दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं. सतत भूक लागत नाही यामुळे ओव्हर इटिंग टाळता येतं. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर ढोकळ्याचा आहारात समावेश करा.